हातुर्ली जंक्शन ते तिखाजनपर्यंतचा रस्ता कधी दुरुस्त होणार?

लोकप्रतिनिधींवर जनता नाराज
Road
Road Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: मये मतदारसंघातील हातुर्ली जंक्शन ते मये येथील तिखाजनपर्यंतचा रस्ता दुरुस्त न केल्याने आमदारांसह (MLA) सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर जनता नाराज आहे. (Haturlim locals complain about bad road in goa)

Road
कुडतरी पोलिसांची चौकशी करण्याचे थेट PMO चे आदेश

“आम्हाला माहित नाही की आमदार आणि इतर निवडून आलेले प्रतिनिधी कशासाठी आहेत. माजी आमदार, प्रवीण झांट्ये यांनी केवळ रस्त्याची पाहणी केली, मात्र त्यानंतर काहीही झाले नाही,” असा दावा नागरिकांनी केला आहे.

या एक किमी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत काहीही केले जात नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. डिचोली, मये (Mayem) आणि इतर ठिकाणाहून चोडण फेरीने जायचे असल्याने हा सर्वात वर्दळीचा रस्ता आहे.

Road
गोवा वीज खात्यात लावणार शिस्त!

या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या रस्त्यावर स्पीड ब्रेकर लावण्याचीही मागणी होत आहे. “गेल्या 15 वर्षांपासून या रस्त्याची कोणीही दुरुस्ती केलेली नाही. सर्वजण या रस्त्याकडे दुर्लक्ष का करत आहेत हे आम्हाला कळत नाही,” अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com