Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Western Bypass Accident: रस्त्याच्या लोकार्पणानंतर तासाभरात अपघात; कारण अस्पष्ट

Margao Western Bypass Inauguration: सोमवारी केवळ एका तासाभरात या रस्त्यावर पहिल्या अपघाताची नोंद झाली

Akshata Chhatre

सासष्टी: पश्र्चिम बगल रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला केल्याने मडगाव व परिसरातील वाहतुकीची जी कोंडी होत होती ती आता पूर्णपणे बंद होईल असं म्हटलं जातंय. या रस्त्याचा शुभारंभ म्हणजे दक्षिण गोव्यातील लोकांना नाताळ व नववर्षाचे गिफ्ट असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पश्रिम बगल रस्त्याचे उद्‌घाटन करताना म्हटले मात्र सोमवारी केवळ एका तासाभरात या रस्त्यावर पहिल्या अपघाताची नोंद झाली.

बाणावली ते सुरावली रस्त्यावर एका क्रेन आणि चारचाकीमध्ये हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनाही तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघाताचे प्रमुख कारण शोधण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप या अपघाताचे कारण समोर येऊ शकलेले नाही.

१२ किमी अंतराच्या रस्त्यासाठी एकूण ४८२ कोटी रुपये खर्च आलाय . त्यातील केंद्राकडून २४७ कोटी व गोवा सरकारने २३५ कोटी रुपयांचा भार उचलला आहे. सोमवारी हा २.७५ किमी अंतराचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आला, उर्वरित रस्ता यापूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.

सोमवारी झालेल्या नवीन रस्त्याच्या उद्‌घाटन सोहळयाला पर्यावरण व कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, मडगावचे नगरसेवक व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT