Margao Western Bypass: ‘दक्षिणे’ला नाताळ, नववर्षाचे गिफ्ट! पश्र्चिम बगल रस्त्याचे उद्‌घाटन

CM Pramod Sawant: पश्र्चिम बगल रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला केल्याने मडगाव व परिसरातील वाहतुकीची जी कोंडी होत होती ती आता पूर्णपणे बंद होईल.
Pramod Sawant, Vijai Sardesai, aleixo sequeira
Pramod Sawant, Vijai Sardesai, aleixo Dainik Gomantak
Published on
Updated on

Margao Western Bypass Opening

सासष्टी: पश्र्चिम बगल रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला केल्याने मडगाव व परिसरातील वाहतुकीची जी कोंडी होत होती ती आता पूर्णपणे बंद होईल. या रस्त्याचा शुभारंभ म्हणजे दक्षिण गोव्यातील लोकांना नाताळ व नववर्षाचे गिफ्ट असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पश्रिम बगल रस्त्याचे उद्‌घाटन केल्यावर सांगितले.

याप्रसंगी पर्यावरण व कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, मडगावचे नगरसेवक व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

गत पाच वर्षांत केंद्र सरकारच्या सहकार्याने गोव्यात अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. पुढील पाच वर्षांत मडगाव-कुंकळ्ळी रस्ता, मोले ते पणजी, केरी ते पणजी, पत्रादेवी ते काणकोण या सर्व रस्त्यांची दुरुस्ती, हॉटमिक्सिंग, रुंदीकरण पूर्ण केले जाईल. दाबोळी उड्डाणपुलाची कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची असल्याने हे कामही लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

Pramod Sawant, Vijai Sardesai, aleixo sequeira
Bhoma Road Widening : महामार्ग रुंदीकरणप्रश्नी स्पष्टीकरण द्या! भोमवासीयांची मागणी; नव्या पर्यावरणीय अहवालासाठी ग्रामस्थ आग्रही

केंद्राच्या मदतीने विकास

मुख्यमंत्र्यांनी यावेळी गोव्यात केंद्र सरकारच्या मदतीने केलेल्या चौफेर विकासाचा पाढा वाचला तसेच पुढील पाच वर्षांत ज्या साधनसुविधा उपलब्ध केल्या जातील त्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच नितीन गडकरी यांचे गोव्याला देत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी तमाम गोमंतकीयांना नाताळ व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Pramod Sawant, Vijai Sardesai, aleixo sequeira
Goa Beef Strike: ऐन ख्रिसमसच्या वेळी बीफची दुकानं बंद!! "कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही" मुख्यमंत्र्यांचा इशारा

साधनसुविधा, मानव संसाधन विकासावर भर

या १२ किमी अंतराच्या रस्त्यासाठी एकूण ४८२ कोटी रुपये खर्च आला. त्यातील केंद्राकडून २४७ कोटी व गोवा सरकारने २३५ कोटी रुपयांचा भार उचलला. आज हा २.७५ किमी अंतराचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. उर्वरित रस्ता यापूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.

सरकार साधनसुविधा व मानव संसाधन विकासावर जास्त भर देत आहे. मुरगाव पोर्ट ट्रस्ट जोडणाऱ्या रस्त्याचे उद्‌घाटन लवकरच केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. हा रस्ता खुला झाल्यावर वास्को शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्र्न मिटेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com