Kadamba Transport Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport: ‘कदंब’च्या पहिल्या 23 बसेस भंगारात !

ई-निविदा जारी: सुमारे दीडशेच्या आसपास बसेस निघणार स्क्रॅपमध्ये

दैनिक गोमन्तक

Kadamba Transport: कदंब परिवहन महामंडळाने आता आपल्या डोक्यावरील बंद बसेसचे ओझे कमी करायला सुरुवात केली आहे. न धावणाऱ्या खराब बसेस स्क्रॅपमध्ये काढण्यास सुरुवात केली आहे. महामंडळाने काही दिवसांपूर्वीच ई निविदा जारी केली असून, पहिल्या टप्प्यात २३ बसेस स्क्रॅपमध्ये काढण्यात आल्याची माहिती महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी ‘गोमन्तक''ला दिली.

कदंब परिवहन महामंडळाच्या पर्वरी येथील यार्ड व महामंडळाच्या इतर कार्यशाळांमध्ये बंद पडलेल्या दीडशेच्या आसपास बसेस आहेत, त्या स्क्रॅपमध्ये काढण्यास सुरुवात केली आहे. अनेक वर्षांपासून या बंद पडलेल्या बसेस जागा अडवून आहेत. या बसेस स्क्रॅपमध्ये काढल्या जाणार असल्याने भंगार अड्ड्यांचे स्वरुप आलेली जागा आता मोकळी होणार आहे. दुसऱ्या बाजूला महामंडळाने बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रॉनिक बस सेवेवर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे.

त्याशिवाय महामंडळाकडे यापूर्वी असलेली व डिझेलवर चालणाऱ्या अनेक बसेसचे आयुर्मान संपत आले आहे. केंद्र सरकारकडून १५ वर्षांचे आयुर्मान संपलेल्या वाहनांना भंगारात काढण्याच्या आदेशाची अंमलबजावणी सरकारी वाहनांसाठी लागू झाली आहे.

कदंब महामंडळाला जर १५ वर्षे वय झालेल्या वाहनांचा नियम लागू झाला तर अनेक बसेस सेवेतून बाद होतील, अशी स्थिती आहे. भंगारात काढलेल्या २३ बसेससाठी बोलीधारकांसाठी दि.२५ पर्यंत निविदा दस्तऐवज अपलोड करणे सक्तीचे आहे. २९ रोजी सकाळी ११ वा. निविदा उघडल्या जातील,असे ई-निविदेत नमूद आहे.

आणखी १९८ ई-बसेस मिळणार

राज्यातील अंतर्गत वाहतूक पूर्णतः इलेक्ट्रॉनिक बसद्वारे करण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे राज्याला १९८ इलेक्ट्रॉनिक बसेस मिळणार आहेत. त्यातील ८३ बसेस राज्यातील रस्त्यांवरून धावू लागल्या आहेत. याशिवाय आणखी ११५ इलेक्ट्रॉनिक बसेस येणे बाकी असून, त्या आल्यानंतर आयुर्मान संपलेल्या बसेस स्क्रॅपमध्ये काढल्या जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT