Sanjay School Porvorim: शेवटपर्यंत मृत्यूशी दिली झुंज! संजय स्कूलमधील 'त्या' दिव्यांग विद्यार्थ्याचा मृत्यू

अपघात की सरकारचा हलगर्जीपणा?
Sanjay School Disabled Student Death in Goa
Sanjay School Disabled Student Death in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Sanjay School Disabled Student Death in Goa: पर्वरी येथील संजय स्कूलच्या जुन्या इमारतीवरून काही दिवसांपूर्वी एक दिव्यांग पडून तो जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तो आधीच मणक्याच्या दुखापतीने त्रस्त होता आणि तेव्हापासून तो आयुष्याशी झुंज देत होता. मात्र शेवटी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. यामुळे राज्यभर हळहळ व्यक्त होत असून याला नेमके जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.

Sanjay School Disabled Student Death in Goa
Margao Municipal Council: नोकरभरती प्रक्रिया का रोखली: कॉंग्रेस नेते एल्विस गोम्स

'तो बराच काळ आयसीयूमध्ये दाखल होता, आणि आम्हाला त्याला भेटण्याची परवानगी नव्हती. त्याच्या दुखापतींमुळे त्याला खूप त्रास झाला आणि खूप वेदना होत होत्या. शेवटी देवाने त्याला घरी बोलावून घेतले', असे मत कुटुंबातील एका सदस्याने व्यक्त केले. दरम्यान, अंत्यसंस्काराची वेळ अद्याप कुटुंबाने ठरवलेली नाही.

इमारतीवरून पडल्यानंतर विद्यार्थी कंबरेपासून खाली लुळा झाला होता. संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन येथील व्यावसायिक केंद्रात नियमितपणे काम करत असलेला तो विद्यार्थी एससीईआरटी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आधार सुविधा केंद्रात गेला होता, जिथे तो एका रेलिंगला टेकला असता खाली पडला आणि जखमी झाला होता.

गोवा डिसॅबिलिटी राइट्स असोसिएशन (DRAG) ने यापूर्वी त्या जखमी विद्यार्थ्याला सरकारने 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे म्हटले होते. त्याच्या या अपघाताला सरकारच जबाबदार असल्याचे DRAG तर्फे सांगण्यात आले होते.

कारण राज्य अपंग व्यक्तींसाठीच्या आयुक्तांनी फेब्रुवारीमध्ये शाळेला दिलेल्या भेटीत सदर इमारत जीर्ण आणि धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला होता.

तसेच संजय शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करून शाळा स्थलांतरित करण्याची शिफारस केली होती. मात्र यावर पुढे काहीच हालचाल झाली नाही, परिणामी या दुर्दैवी घटनेमध्ये एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com