Morjim Panchayat: झोपडी पाडलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा!मच्छिमारांची मागणी

मच्छिमारांची मागणी : मोरजी पंचायतीकडून आपद्‍ग्रस्ताला तातडीने आर्थिक मदत प्रदान
Goa News
Goa NewsDainik Gomantak

Morjim Panchayat: मोरजी पंचायत क्षेत्रातील विठ्ठलदास वाडा किनारी भागात पारंपरिक मच्छिमारी करणाऱ्या व्यावसायिकाची एक झोपडी आठ दिवसांपूर्वी पूर्वकल्पना न देता पर्यटन खात्याने हटवली होती. त्या संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी,अशी मागणी व्यावसायिकांबरोबरच मोरजी पंचायत मंडळानेही केली आहे. मोरजी पंचायतीने ज्या पारंपरिक मच्छिमार व्यावसायिकाची झोपडी पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाडली होती, त्याला आर्थिक मदत प्रदान केली.

Goa News
Goa : आरती स्पर्धेत ‘मुष्टीफंड हायस्कूल’ विजेते

उपसरपंच पवन मोरजे, माजी उपसरपंच अमित शेटगावकर, पंचायत सदस्य मंदार पोके, मुकेश गडेकर आणि व्यावसायिक यावेळी उपस्थित होते. मोरजी विठ्ठलदास वाडा किनारी भागात शेकडो पारंपरिक मच्छिमारी होड्या आहेत. आणि ह्या होड्या पर्यटन व्यवसाय सुरू होण्यापूर्वी कॅप्टन ऑफ पोर्ट किंवा पर्यटन खात्याच्या जमिनीत हंगामी स्वरूपाच्या झोपड्या उभारून ठेवल्या जातात.

या व्यावसायिकांनीच आजपर्यंत सरकारची जमीन सुरक्षित ठेवण्याचे काम अविरत केले आहे. अशाच प्रकारची एक झोपडी व्यावसायिकाने किनारी भागात पावसाळ्यात होडी आणि जाळे सुरक्षित ठेवण्यासाठी उभारली होती.

Goa News
Goa Dhangar Community: धनगर समाजाला एसटी दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करू

परंतु पर्यटन खात्याने कसलीही पूर्वकल्पना न देता ती झोपडी हटवली. याची गंभीर दखल मोरजी पंचायत मंडळाने घेऊन झोपडी हटवू नये, अशी अधिकाऱ्यांकडे विनवणी केली.

मात्र, जणू या दोन अधिकाऱ्यांनी कुणाचेही न ऐकून घेता झोपडी मोडून टाकली. परंतु केवळ एकच झोपडी पाडण्या मागचे कारण काय? असे स्थानिकांनी त्या अधिकाऱ्यांना विचारले. परंतु त्या अधिकाऱ्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्याबद्दल आजही व्यावसायिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर मोरजी पंचायत मंडळाने जे दोन अधिकारी झोपडी हटवण्यासाठी आले होते. त्यांच्यावर कडक कारवाई करावी. केवळ कारवाईचा देखावा करून हा विषय संपणार नाही,असा इशारा स्थानिक पंचायत सदस्य विलास मोरजे यांनी दिला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com