Fire Safety Dainik Gomantak
गोवा

Fire Safety: गोव्यात आगीच्या घटनांमध्ये अनेकपटींनी वाढ कारण...

अनेकांनी तर आगप्रतिबंधक किट आपल्या आस्थापनात ठेवलेले नाही, त्यामुळे आगीच्या घटनांमध्ये अनेकपटींनी वाढ होत आहे.

दैनिक गोमन्तक

Fire in Goa: सासष्टीतील व्यावसायिक अग्निसुरक्षा प्रणाली स्थापन करण्याविषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी तर आगप्रतिबंधक किट आपल्या आस्थापनात ठेवलेले नाही. अग्निरोधक उपायांविषयी व्यापाऱ्यांचे दुर्लक्ष स्पष्ट जाणवत आहे.

त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत असल्याचे मडगाव अग्निशमन केंद्राचे मुख्याधिकारी गिल सौझा यांनी सांगितले .

यातील फारच कमी आस्थापनांमध्ये आवश्यक यंत्रणा आणि राज्य अग्निशमन विभागाकडून अनिवार्य मंजुरी आहे. मात्र अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आगीच्या घटनांमध्ये अनेकपटींनी वाढ होत आहे.

अग्निसुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पथकांद्वारे तपासणी केल्यानंतर दुकाने किंवा इमारतींच्या मालकांना अग्निसुरक्षेचे योग्य उपाय करण्यासाठी नोटिसा जारी केल्या गेल्या, परंतु त्याचे पालन झाले नाही.

काही दुकाने किंवा गृहसंकुलांमध्ये आवश्यक उपकरणे आहेत. मात्र त्यांनी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात त्यांनी रस दाखविलेला नाही.

गतवर्षी 2.5 कोटींची मालमत्ता वाचविली

गेल्या वर्षी अग्निशमन दलाकडे या तालुक्यात 558 आपत्कालीन कॉल आले होते, त्यापैकी 201 आगीच्या घटनाची नोंद झाली आहे. या आगीच्या दुर्घटनांत एकूण 62 लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर 2.5 कोटींची मालमत्ता वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले.

झोनिंग नियमांनुसार सर्व उंच इमारतींना अग्निशमन विभागाकडून ‘ना हरकत’ घेणे अनिवार्य आहे. मात्र,असे असूनही काहीजण इमारतीची उंची मर्यादित ठेवून अग्निरोधक प्रणाली लावणे टाळतात. त्यामुळे कुठल्याही इमारतीत आग लागल्यास अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात अडथळे निर्माण येतात. -गिल सौझा, अग्निशमन अधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT