Short Circuit At Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa Short Circuit: म्हापशात शॉर्ट सर्किटमुळे आग; ५ लाखांचे नुकसान

Short Circuit At Mapusa: आग दुकानाचा पोटमाळा तसेच आतील केबिनमध्ये पसरली नसल्याने मोठी हानी टळली

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: फेअरा, बाईक्सा, म्हापसा येथील रिलायबल प्रिन्टर्स या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना गुरुवारी घडली. या दुर्घटनेत ५ लाखांचे आर्थिक नुकसान झाले. हे दुकान नीलेश सांगोडकर यांच्या मालकीचे आहे.

उपलब्ध माहितीनुसार, येथील ओम चेबर्स इमारतीमधील रिलायबल प्रिन्टर्स या दुकानाला शार्ट सर्किटमुळे आग लागली. यात दुकानातील संगणक, प्रिंटरसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाल्याने ५ लाखांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी पहाटे २च्या सुमारास घडली.

शॉर्ट सर्किटमुळे दुकानाच्या दर्शनी केबिनमध्ये सर्वप्रथम आग लागली. एसी, लॅपटॉप, प्रिन्टर, टीव्ही स्क्रीन, सीसीटीव्ही कॅमेरा, टेबल, खुर्ची व इतर विद्युत्त उपकरणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने ही आग दुकानाचा पोटमाळा तसेच आतील केबिनमध्ये पसरली नसल्याने मोठी हानी टळली.

या दुर्घटनेत अंदाजे ५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानमालक नीलेश सांगोडकर यांनी दिली. घटनेच्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे दुकानाला आग लागल्याचा अंदाज इमारतीमधील कुणालाही आला नाही. वीज कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT