Goa Fire Case: होंडा येथे कपड्याच्या गोदामाला आग लागून दोन लाखांचे नुकसान

Goa Fire Case: सायंकाळी 5.30 वाजता सुरू झालेले हे मदतकार्य रात्री 10.30 पर्यंत सुरू होते.
Goa Fire Case
Goa Fire CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Fire Case: होंडा येथे कपड्याच्या गोदामाला आग लागून दोन लाखांचे नुकसानहोंडा औद्योगिक वसाहतीमधील एका कपड्याच्या गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, होंडा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये आज सायंकाळी ५.२० वाजता महेश खोलकर यांच्या मालकीच्या रुतुक एंटरप्रायझेस या गादी तयार करण्यात येणाऱ्या आस्थापनातील गोदामात वीज यंत्रणेमध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किटमुळे तेथील कपड्यांना आग लागली.

यावेळी आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग शमविताना अडचण निर्माण झाली. वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले.

सायंकाळी ५.३० वाजता सुरू झालेले हे मदतकार्य रात्री १०.३० पर्यंत सुरू होते. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने गोदामातील काही कपडे बाहेर काढण्यात आले.

या दुर्घटनेत सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने जीवितहानी टळली. वाळपई अग्निशमन दलाचे जवान श्रीकांत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी मदतकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Ranji team preparation 2026
Damone family six deaths
Mapusa Kidnapping Cases 2026
Goa bench Fire Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com