Huge fire in Sonsodo Garbage Yard Dainik Gomantak
गोवा

सोनसोडोवरील आग दुसऱ्या दिवशीही धुमसतीच

सोनसोडोच्या कचऱ्यावर माती घालण्यास सुरुवात, सकाळपासून पाण्याचाही शिडकाव

दैनिक गोमन्तक

मडगाव : सोनसोड्यावरील आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण आणले असले तरी अधून मधून ही आग घुमसणे शनिवारीही सुरुच होते. ही आग अधिक भडकू नये यासाठी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर माती घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 40 ट्रक माती या कचऱ्यावर टाकण्यात आली असून ज्या भागात ही आग लागली होती, ती दुसऱ्या बाजूने पसरु नये यासाठी पोकलॅन वापरून चर खोदण्यात आला आहे. (Sonsodo Fire News Updates)

मडगावच्या अग्निशमन दलाचे (Fire Brigade) अधिकारी गिल डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळीही परत आग धुमसू लागल्याने दोन गाड्या वापरुन या कचऱ्यावर पाणी मारून ती विझवण्यात आली. काल ही आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे 80 हजार लिटर पाण्याचा वापर करण्यात आला होता. तरीही रात्री आग परत धुमसल्याने पुन्हा आगीचे बंब या कचरा (Garbage) यार्डावर आणावे लागले होते.

दरम्यान या आगीत (Fire) पालिकेचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. या आगीत पालिकेची दोन प्लास्टिक कचऱ्याचे बेलिंग करणारी मशिन्स जाळून खाक झाली. त्याशिवाय या ठिकाणी ठेवलेल्या कचरा पेट्याही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Liquor Seized: ट्रकला लागली 'आग', तस्करीचा झाला पर्दाफाश; धारगळमधून 60 लाखांची दारू जप्त

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती तवडकरांना मिळणार मंत्रीपद, सिक्वेरा देणार राजीनामा; गणेश गांवकराकडे सभापती पदाची धूरा

Goa Cricket: गोव्याची दिल्लीत दमदार कामगिरी, क्रिकेट संघांची आगेकूच; मुली उपांत्य फेरीत दाखल

Goa Live News: वृद्ध महिलेच्या घराचे छप्पर कोसळण्याच्या मार्गावर; समाजसेवक शिवप्रसाद शिरोडकर करणार मदत

Scheduled Tribal Area: गोव्यात अनुसूचित आदिवासी क्षेत्राची गरज! तवडकरांचे प्रतिपादन; राष्ट्रपतींकडे मांडला इतिहास

SCROLL FOR NEXT