Cuncolim Dainik Gomantak
गोवा

Cuncolim: कुंकळ्ळीत मिनरल वॉटर कारखान्याला आग

Cuncolim: लाखोंचे नुकसान : मशिनरीसह संगणक, टेबल, खुर्च्या भस्‍मसात

दैनिक गोमन्तक

Cuncolim: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील डिमॅक इंडस्ट्रीजमध्ये शनिवारी रात्री आगीची घटना घडली. वीज खंडित केल्यावर कुंकळ्ळी अग्निशामक दलाकडून मशिनरीवर पाण्याचा मारा करीत ही आग विझवण्यात आली.

या घटनेत कंपनीतील मशिनरीसह संगणक, टेबल, खुर्च्या अशा साहित्यासह लाखो रुपयांचे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील सिंडीज आयस्क्रीम फॅक्टरीनजीक असलेल्या डिमॅक इंडस्ट्रीजमधील मशिनरीला आग लागण्याची घटना शनिवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली. डिमॅक इंडस्ट्रीजमध्ये मिनरल वॉटर बॉटल्समध्ये भरण्यात येते.

आगीच्या घटनेनंतर कुंकळ्ळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी वीज पुरवठा खंडित केला आणि दीड तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री साडेअकरा वाजता आगीवर नियंत्रण आणले.

या आगीमध्ये कंपनीतील पाणी बाटल्यामध्ये भरण्याचे मशिन, बाटल्या, सीलबंद करण्याची मशिन, पाणी बाटलीवर लेबल लावण्याचे मशिन यासह इतर मशिन्स व दोन संगणक, दोन टेबल, खुर्च्या असे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात कंपनीचे लाखाेंची हानी झालेली आहे. कुंकळ्ळी अग्निशामक दलाचे अधिकारी तृप्तेश नाईक यांच्यासह नीलेश नाईक, रमण गावकर, हरी पावस्कर, सिद्धांत आरोलकर, सौरभ शेटकर यांनी आग नियंत्रणात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

SCROLL FOR NEXT