symbolic image  Dainik Gomantak
गोवा

हणजुणमध्ये आगीत लाकडी रेस्टॉरंट जळून खाक

पाच लाखांचे नुकसान, फर्निचर, फ्रीजचे नुकसान

दैनिक गोमन्तक

शिवोली: ग्रेंड -पिकेन, हणजुण येथील ब्ल्यू -लाईन हॉस्पिटलीटी या घरगुती रेस्टॉरंटला बुधवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एक मजली लाकडी रेस्टॉरंट जळून खाक झाले. या आगीत लाकडी फर्निचर, विजेवर चालणारी फ्रीज आदी उपकरणे तसेच खाद्यपदार्थाचे सामान मिळून अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती म्हापसा अग्निशमन दलाकडून मिळाली.

रात्री साडेबाराच्या सुमारास जेवण्यासाठी घेण्यासाठी एकत्रित बसलेल्या तेथील कर्मचाऱ्यांना रेस्टॉरंटच्या मध्यभागातून आग लागल्याचे लक्षात आले. यावेळी क्षणाचीही उसंत न घेता कर्मचाऱ्यांनी जवळच्या नळाच्या पाण्याचा फंवारा मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी तत्काळ आगीने रौद्ररुप धारण केल्याने शेवटी म्हापसा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे पथक तात्काळ हणजुणात दाखल झाले. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

ब्ल्यू लाईन हॉस्पिटलीटी रेस्टॉरंटपासून शंभरेक मीटरच्या परिसरात कळंगुटातील एका बड्या राजकीय व्यक्तीचे रेस्टॉरंट असल्याने स्थानिकांत मोठा गोंधळ उडाल्याचे यावेळी दिसून आले.. म्हापसा अग्निशमन दलाचे उपअधिकारी अशोक परब यांच्या नेतृत्वाखाली फायरमन परेश मांद्रेकर, सूरज कारापुरकर, नीतीन मयेंकर, अक्षय सावंत , स्वपनेश कळंगुटकर, अर्जुन धावस्कर, प्रवीण पिसुर्लेकर तसेच ड्रायव्हर देवेंद्र नाईक यांनी भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SOPO Tax: दक्षिण गोव्यातील 'सोपो' प्रकरणात घोटाळ्याची शक्यता! निविदा जारी करण्यास विलंब; SGPDAचे आर्थिक नुकसान

Goa Live Updates: कदंब बस मागे घेत असताना टायर गेला गटारात, वाहतुकीवर परिणाम

Digambar Singbal: स्वतंत्र प्रतिभेचे दिग्दर्शक! कोकणी नाटकांची प्रतिमा बदलणारे 'दिगंबर सिंगबाळ'

Goa Cabinet: संवेदनशील खात्यांची धुरा CM सावंतांकडे! ‘पुरातत्व, पुराभिलेख’ची जबाबदारी; ‘निर्णायक नेता’ म्हणून होणार प्रतिमा दृढ

Goa: '..अन्यथा अनुदान थांबवू'! कचरा विषयावर सरकार गंभीर; होणार कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT