Goa Fire News | Santacruz  Dainik Gomantak
गोवा

Goa Fire News: सांताक्रुझमधील पोर्तुगीजकालीन बंद घराला आग; लाखो रूपयांचे नुकसान

दोन तासांनी आग आटोक्यात, किंमती साहित्य खाक

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Fire News: सांताक्रुझ येथील पोर्तुगीजकालीन बंद घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 5 च्या दरम्यान घडली. दोन तास आगीशी झुंज दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ती आटोक्यात आणली.

या आगीत घरातील पोर्तुगीजकालीन जुने लाकडी सामान व वस्तू तसेच घराच्या छप्पराचे सामान खाक झाले. ही आग विझवण्यासाठी तीन पाण्याचे बंब वापरण्यात आल्याची माहिती पणजीचे अग्निशमन स्थानकाचे अधिकारी दिलीप गावस यांनी दिली.

हे पोर्तुगीजकालीन घर मिनेझिस वाझ यांचे असून ते बंद होते. घरातून धूर येऊ लागल्याने शेजारच्या घरातील लोकांनी तसेच स्थानिक आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला दिली. लोकांनी या घराचे बंद असलेले टाळे तोडून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला.

दलाचे जवान पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळी पोहचले तोपर्यंत आग भडकली होती. आगीचा भडका मोठा असल्याने पाण्याच्या बंबच्या अधिक गाड्या मागवण्यात आल्या. घटनास्थळी आमदार रुडॉल्फ फर्नांडिस उपस्थित होते.

किमती साहित्य खाक

पोर्तुगीजकालीन घर असल्याने ते लाकडी सामानाचे होते. घराचे छप्पर हे लाकडी सामानावर होते तसेच घरात किंमती जुने लाकडी सामान होते. घरातील सर्व खोल्यांमधील सामान आगीत खाक झाले आहे. या आगीमागील कारण स्पष्ट झालेले नाही.

वीज खात्याशी यासंदर्भात संपर्क साधण्यात आला आहे. या आगीत किती नुकसान झाले याचा अंदाज व्यक्त करता येत नाही. लाखो रुपयांचे नुकसान झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे गावस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT