Vasco Crime News: तो काठी घेऊन आला आणि थेट गाड्या फोडत सुटला.... पेट्रोल पंपावरील मीटरही फोडले

वास्कोतील जोशी पेट्रोलपंपावरील घटना; कर्मचारी, वाहनधारकांनी काढला पळ
Vasco Crime News:
Vasco Crime News: Dainik Gomantak

Vasco Crime News: वास्को येथे जोशी पेट्रोलपंपजवळ एका मनोरुग्ण इसमाने गाड्यांची तोडफोड करून नंतर पेट्रोलपंपचेही मीटर फोडले. या इसमाला लोकांनी पकडून चोप देऊन नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.

Vasco Crime News:
Goa Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशन आता 'इतकेच' दिवस; विजय सरदेसाई, युरी आलेमाव यांची टीका...

शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता जोशी पेट्रोल पंपाजवळ एक व्यक्ती हातात काठी घेऊन धावत आला, आणि तिथे पार्क करून ठेवलेल्या चार चाकी वाहनांच्या काचा फोडण्यास त्याने सुरुवात केली. नंतर त्याने जोशी पेट्रोलपंपच्या दिशेने धाव घेऊन पेट्रोलपंपावरील काही मीटर्सचीही नासधुस केली.

उपस्थितांना नेमके काय घडत आहे तेच कळेना. यावेळी पेट्रोलपंपावर तीन महिला कर्मचारी व एक पुरुष कर्मचारी होते. हा इसम धुडगूस घालत असल्याचे पाहून पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. तसेच गाडीत पेट्रोल घालण्यासाठी आलेल्या वाहनचालकांनीही घाबरून पळ काढला.

Vasco Crime News:
Goa Mock Drill: चक्रीवादळ आल्यास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा किती सज्ज ? आयवा किनाऱ्यावर 'अशी' झाली तपासणी...

दरम्यान सदर इसम नासधूस करत असल्याचे पाहून काही लोकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळी धाव घेत या इसमाला ताब्यात घेतले.

पोलिस स्थानकात नेऊन त्याची चौकशी केली असता तो मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले. त्या इसमाचे वडील पोलिस स्थानकात आले. त्यांनी तो मनोरुग्ण असल्याचे प्रमाणपत्र पोलिसासमोर सादर केले. चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले. हा इसम जोशी पेट्रोलपंप परीसरात राहतो.

दरम्यान मनोरुग्णाने तोडफोड केलेल्या तीन चार चाकी वाहनांचे तसेच पेट्रोल पंपाचे नुकसान झाले आहे. तर जोशी पेट्रोल पंपवरील चारपैकी तीन पेट्रोल मीटर फोडल्याने ते नादुरुस्त झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com