Panic In Goa-Delhi Flight Due To Opening Dog Cage Dainik Gomantak
गोवा

Goa-Delhi Flight: विमानात तरुणीने उघडला श्वानाचा पिंजरा; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील घटना

मोपा विमानतळ पोलिसांत तरुणीविरुध्द तक्रार दाखल

Rajat Sawant

Panic In Flight Due To Opening Dog Cage: मोपा विमानतळ पोलिसांत एका तरुणीविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे. विमानात आपल्या सोबत असलेल्या श्वानाचा पिंजरा उघडून दहशत निर्माण केल्याच्या आरोपाखाली ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोपा विमानतळ पोलिस पुढील तपास करीत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-गोवा फ्लाइटमध्ये संशयित प्रवासी अलीशाने आपल्यासोबत एक श्वान पिंजऱ्यामध्ये घेतला होता. फ्लाइटने उड्डाण केल्यावर हवेत मध्यावर श्वानाचा पिंजरा उघडला. यामुळे सहप्रवासी आणि क्रू यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असे तक्रारीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी संशयिताविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, काही एअरलाईन्स पाळीव प्राण्यांना केबिनमध्ये विमानात घेऊन जाण्याची परवानगी देतात. पाळीव प्राण्याचे वजन पाच किलोपेक्षा जास्त नसल्यास तसेच पाळीव प्राण्यांचे वय आठ आठवडे असल्यास परवानगी दिली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट जगतात खळबळ! रोहित-विराटच्या निवृत्तीचा 'डाव' गंभीरने रचला? पुजारानंतर आणखी एका खेळाडूचा 'हल्लाबोल'

Goa Politics: खरी कुजबुज; 'त्या' भावी नगरसेवकांना हवाय युरीचा आशीर्वाद!

Goa Live News: बोणबाग बेतोडावासीयांचा इशारा! 'शिवाजी नगर'साठी नवी पाईपलाईन बसवण्याचे काम रोखणार

IFFI Goa 2025: इफ्फीच्या उद्‍घाटनाच्या चित्रपटाचे सिनेकर्मींना आमंत्रण का नाही? 'फिल्म मेकर्स'चा सवाल; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

Goa Crime: दक्षिण गोव्‍यात सात दिवसांत चार अल्‍पवयीनांची अपहरणे, एका प्रकरणाचा छडा; तीन तपासाविना प्रलंबित

SCROLL FOR NEXT