आगशी: रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे आमदार विरेश बोरकर यांचा भाऊ साईश बोरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका खासगी कंपनीच्या आवारात खुसखोरी करून सुरक्षा कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी आगशी पोलीस स्थानकात साईश बोरकर याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय आणि सध्या हाच व्हिडो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये साईश बोरकर हातात लोखंडी रॉड घेऊन एका कंपनीच्या जागेत घुसखोरी करताना आणि सुरक्षा कर्मचाऱ्याला दमदाटी करताना दिसतोय. समोर आलेल्या माहितीनुसार साईश बोरकर याने सुरक्षा कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि पोलिसांकडे कारवाईची मागणी केली.
आगशी पोलिसांनी या घटनेची दखल घेत साईश बोरकर यांच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आलीये.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईश बोरकर यांच्यावर अनधिकृतपणे कंपनीच्या जागेत घुसखोरी करणे, सुरक्षा रक्षकाला धमकावणे आणि शिवीगाळ करणे यांसारखे आरोप आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून आणखीन तपशील उघड होण्याची प्रतीक्षा आहे.
म्हापश्यात ईस्टरच्या संध्येला झारखंडमधील तरुणांनी आयोजित केलेला सांस्कृतिक कार्यक्रम बराच वादग्रस्त ठरलाय. परप्रांतीय तरुणांवर धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली प्रत्यक्षात मात्र मद्यपान, धूम्रपान आणि मोठ्या आवाजात संगीत लावून धिंगाणा घातल्याचा आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्यावेळी कोणताही धार्मिक विधी पार पडलेला नाही असे सूत्रांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर, तरुण म्हापसा बसस्थानकावर जमा झाले आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना दिसले. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत. या व्हिडिओमध्ये तरुण रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत पडलेले आणि त्यांच्याजवळ बिअरच्या बाटल्या दिसत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.