Vijai Sardesai

 

Dainik Gomantak

गोवा

...त्यामुळे विजय सरदेसाई आणि इतर 100 जणांवर एफआयआर

सरकारी नोकरांना कायदेशीर कारवाई करण्यापासून रोखणे अशा विविध गुन्ह्याखाली आज फातोर्डा पोलिसांनी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) आणि गोवा फॉरवर्डच्या (Goa Forward Party) सुमारे 100 कार्यकर्त्यावर गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा

Margao: मडगाव - फोंडा राज्य हमरस्ता अडविणे, बेकायदा जमाव बनविणे, सरकारी नोकरांना कायदेशीर कारवाई करण्यापासून रोखणे अशा विविध गुन्ह्याखाली आज फातोर्डा पोलिसांनी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) आणि गोवा फॉरवर्डच्या (Goa Forward Party) सुमारे 100 कार्यकर्त्यावर गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान सरदेसाई यांनी निरीक्षक कपील नायक हे माजी आमदार दामू नाईक यांचे एजंट असून निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्याकडून निपक्ष कृती होणे अवघड असल्याने त्यांना पोलीस स्थानकावरून हटवून निवडणूक कामासाठी त्यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. नायक हे गुन्हेगाराकडून हप्ते घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

काल आंदोलना दरम्यान रस्ता अडवून लोकांची अडवणूक केल्या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी सरदेसाई आणि त्यांच्या समर्थकांवर भारतीय दंड संहितेच्या 143 (बेकायदा जमाव जमविणे), 341 (अडवणूक करणे), 353 (सरकारी नोकरांच्या कामात व्यत्यय आणणे) यासह 149 (दंगल करण्याच्या इराद्याने जमाव जमविणे) या कलमाखाली गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली.

काल फातोर्ड्यातील विकासकामे बंद केल्याच्या निषेधार्थ विजय सरदेसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोर्चा काढून रस्ता अडविला होता. रस्ता मोकळा करण्यासाठी पोलीस आले असता मोर्चेकऱ्यांनी त्यांच्याही हुज्जत घातली होती. यामुळे सुमारे 1 तास राज्य हमरस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती आणि लोकांना त्रास झाला होता.

दरम्यान, कपील नायक हे सराईत खोटारडे असून त्यांनी दाखल केलेले आरोपही खोटे असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. 2012 च्या निवडणुकीच्या वेळी एका वयोवृद्ध पाद्रीने आपल्याला वेळ्ळी चर्चित मारहाण केली अशी खोटी साक्ष त्यांनी हल्लीच न्यायालयात दिली आहे. अशा माणसाकडून खरे काय त्याची अपेक्षा बाळगूच शकत नाही. कपिल नायक यांनी जी बेकायदेशीर माया जमविली आहे त्याचाही आपण लवकरच पर्दाफाश करू असे सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT