Vedanta Dainik Gomantak
गोवा

Vedanta: लाभांशाला विलंब झाल्याने वेदांताला दणका

Vedanta: ‘सेबी’ने आज वेदांता इंडिया कंपनीला केयर्न यूके होल्डिंगला 77.6 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले.

दैनिक गोमन्तक

Vedanta:

‘सेबी’ने आज वेदांता इंडिया कंपनीला केयर्न यूके होल्डिंगला 77.6 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले. लाभांश देण्यास झालेल्या विलंबासंदर्भात ‘सेबी’ने हा निर्णय दिला आहे. वेदांता इंडियाला पूर्वी केयर्न इंडिया म्हणून ओळखले जात होते.

‘सेबी’च्या वेबसाईटवर दिलेल्या या आदेशानुसार, वेदांताला ही रक्कम येत्या 45 दिवसांत भरावी लागेल. न भरल्यास पुढील कारवाई केली जाईल. यासोबतच ‘सेबी’ने कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नवीन अग्रवाल, संचालक, सीईओ आणि सीएफओ यांना एक ते दोन महिन्यांसाठी मार्केटमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. सेबीने जारी केलेल्या निर्णयात म्हटले आहे की, ज्या लाभांशावर निर्णय दिला आहे, तो असा.

२३ जुलै २०१४ (६.५ रुपयांचा लाभांश), १६ सप्टेंबर २०१४ (५ रुपयांचा लाभांश) घोषित केला होता. तसेच २१ जुलै २०१६ (रु. ३ चा लाभांश) आणि ३० मार्च २०१७ रोजी (रु. १७.७. चा लाभांश) जाहीर केला. यावर एकूण ६६६.५३ कोटी रुपयांचा लाभांश देय होता आणि विलंबावर १८ टक्के व्याज देखील द्यावे लागणार होते, जे एकूण ७७.६२ कोटी रुपये थकबाकी होते. आता ही व्याजाची रक्कम ४५ दिवसांत परत करण्याचे निर्देश आहेत.

एप्रिल २०१७ मध्येच केयर्न यूके होल्डिंग्सने ‘सेबी’कडे तक्रार केली होती की, केयर्न इंडियाने ३४० कोटी रुपयांचा लाभांश दिलेला नाही. केयर्न इंडियाचे ११ एप्रिल २०१७ रोजी वेदांतामध्ये विलिनीकरण झाले. केयर्नच्या मते, त्यांच्याकडे केयर्न इंडियाचे १८.४ कोटी शेअर्स होते आणि हा लाभांश या शेअर्सवर देय होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोव्यात 'टीव्हीएस मोटोसूल '5.0' चा थरार; 8,000 रायडर्सची उपस्थिती, दोन नव्या बाइक्सचे अनावरण

Anjuna Dam: अंजुणे धरणातून कालव्यात सोडले पाणी! शेतकऱ्यांत समाधान; बागायतींसाठी ठरणार उपयुक्त

Tourist dies in Goa: मित्रांसोबतची गोवा ट्रीप ठरली अखेरची; चौथ्या मजल्यावरुन कोसळून 27 वर्षीय आसामच्या पर्यटकाचा मृत्यू

Mapusa: ..तोडगा काढा अन्यथा काळे झेंडे दाखवू! म्हापसा व्यापारी संघटनेचा इशारा; आमदारांसह सरकारला दिला अल्टिमेटम

Omkar Elephant: ..नंतर कायदा हातात घेतला तर दोष देऊ नका! उगवेवासीयांचा इशारा; 'ओंकार'चा बंदोबस्त करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT