Congress Dainik Gomantak
गोवा

Usgaon News: उसगाव पंचायतीत आर्थिक गैरव्यवहार

उसगावकरांचा आरोप: दक्षता तसेच पंचायत संचालकांकडे केली लेखी तक्रार

गोमन्तक डिजिटल टीम

Usgaon News सरपंच व सचिवांनी बेकायदेशीरपणे पंचायत बँक खात्यातून एक लाख रुपये वटवले. विशेष म्हणजे, हे पैसे काढताना संबंधितांनी इतर पंच सदस्यांना विश्वासात किंवा ठराव घेतला नव्हता.

दुसरीकडे, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी त्यांनी हे पैसे बँकेतून धनादेशद्वारे काढल्याचा आरोप पंचायतीच्या पंच मनीषा उसगांवकर यांनी केला.

गुरुवारी (ता.१३) म्हापसा येथे काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे सचिव विजय भिके, जिल्हाध्यक्ष विरेंद्र शिरोडकर व कृष्णा नेने हे उपस्थित होते.

उसगांवकर पुढे म्हणाल्या, आपत्कालीन स्थितीत सुद्धा सरपंच व सचिवांना इतकी मोठी रक्कम पंचायत बँक खात्यातून काढता येत नसते. 7 मार्च 2023 रोजी, होळीनिमित्त सुट्टी असल्याने पंचायत कार्यालय बंद होते.

तरीही, सरपंच व सचिवांनी कथितरित्या सुट्टीच्या दिवशी धनादेश जारी केला व 21 मार्चला पैसे काढले. या दोघांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप उसगांवकरांनी यावेळी केला.

यासंदर्भात 27 मार्च 2023 रोजी, मी दक्षता तसेच पंचायत संचालकांकडे लेखी तक्रार केली. मात्र अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही.

अशावेळी मला कायद्याची मदत घ्यावी लागेल, असा इशारा उसगांवकर यांनी दिला. पंच हे बेकायदेशीरपणे जनतेचा पैशांचा अपव्यय करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shocking Viral Video! चालत्या ट्रेनमध्येच प्रवाशानं केली लघवी; संतापलेल्या सहप्रवाशांनी घेरलं, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Junta House Demolition: पणजीतील 'जुन्ता हाउस'च्या पाडकामाला लवकरच सुरुवात, चोहोबाजूंनी पडद्याचे संरक्षण; इमारतीतील साहित्य हटवले

Bill Gates AI Warning: 'एआय'मुळे जाऊ शकतो एक अब्ज लोकांचा जीव! बिल गेट्स यांच्या भूमिकेने टेक जगतात खळबळ; नियम बनवण्याची सरकारकडे मागणी

Bicholim: रुंदीकरण केलेल्या रस्त्यावर बेकायदा पार्किंग, डिचोलीतील प्रकार; 'सेतू संगम' ते पोलिस क्वार्टर्सपर्यंतच्या वाहतुकीस धोका

अनिल सामंतांनी राजभाषा विषय अभ्यासावा... 

SCROLL FOR NEXT