Bandirwada road  Dainik Gomantak
गोवा

अखेर बंदिरवाड्यावर रस्ता पोहचला, 80 टक्के काम पूर्ण

आपत्कालीन समस्या निर्माण झाल्यास नागरिकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत होते

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : गेल्या कित्येक वर्षांपासून सावर्डे पंचायत (Panchayat) क्षेत्रातील बदिंरधनगरवाड्यावर वास्तव करून राहणाऱ्या समाज बांधवांना पक्क्या रस्त्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत होते, त्यामुळे या वाड्याबरोबर काजरेधाट येथील नागरिकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत होते, यासाठी या वाड्यावर रस्त्याची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील नागरिक करीत होते. त्याच प्रमाणे सावर्डे पंचायतीच्या वतीने बऱ्याच वेळा या संबंधी ठराव घेऊन सरकाराकडे पाठवले होते.

मागणीची दखल घेऊन या रस्त्या संबधी शासकीय पातळीवर सर्व सोपस्कार पूर्ण करून कुमठळ ते बदिंरवाडा पर्यंत रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यासाठी प्रतिक्षा करणाऱ्या धनगर समाज बांधवांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

सत्तरी (Satari) तालुक्यातील वाळपई मतदार संघात येणाऱ्या सावर्डे पंचायत क्षेत्रातील कुमठळ गावापासून काही अंतरावर असलेल्या बदिंरवाडा तसेच काजरेधाट या दोन्ही वाड्यावर रस्त्याची सोय नव्हती, त्यात सदर गाव हे म्हादई अभयारण्याच्या परिसरात येत असल्याने तेथे पक्का रस्ता करण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता, त्यामुळे गेली कित्येक वर्षे नागरिकांना (Citizen) दगड वर आलेल्या कच्च्या रस्त्याने प्रवास करून घर गाठावे लागत होते, यामुळे आपत्कालीन समस्या निर्माण झाल्यास नागरिकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत होते. त्याच प्रमाणे शालेय मुलांना शाळेत ये जा करताना समस्या निर्माण होत होती.

त्यामुळे या दोन्ही वाड्यावर रस्त्याची सोय करावी यासाठी नागरिकांनी पंचायतीच्या माध्यमातून मागणी लावून धरली होती, त्या मागणीची दखल घेऊन शासनाच्या वरिष्ठ पातळीवरून हालचाली गतिमान करून या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळवून या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे, सद्या बंदिरवाडा ते काजरेधाट गावापर्यंत रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून, काजरे धाट ते कुमठळ जॅक्शन पर्यंत रस्त्यांचे काम जोरात सुरु आहे.

रस्त्यांचे काम करताना कोणत्याही झाडांची हानी केली नसून, उत्तम दर्जाचे पॅव्हर्स वापरून एकेरी रस्ता बनवला आहे, त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली नागरिकांची प्रतिक्षा संपली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT