Final hearing on disqualification petition of 12 MLAs in Goa bench today  Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीयांचे अंतिम सुनावणीकडे लक्ष! ‘त्या’ 12 आमदारांचे आज काय होणार?

अपात्रता याचिकांवर आज गोवा खंडपीठात अंतिम सुनावणी

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेस (Congress)मगो (MGP) पक्षातून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेल्या 12 आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर आज 10 डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर (Goa court) अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. या प्रकरणात गोवा फॉरवर्डनेही (Goa Forward) याचिका सादर करून मुख्य याचिकादारांना पाठिंबा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या (Goa Election)तोंडावर ही सुनावणी होत असल्याने समस्त गोमंतकीयांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेलेल्या 10 व मगोच्या 2 आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर निवाडा देताना त्या सभापतींनी फेटाळल्याने त्या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. घटनेच्या परिशिष्ट 10 नुसार एखाद्या पक्षातील समितीच्या तसेच विधिमंडळातील दोन तृतियांश आमदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे सक्तीचे आहे. मात्र, असे काँग्रेसबाबत घडलेले नाही. दोन तृतियांश आमदार फुटून गेले असले, तरी काँग्रेस पक्ष अजूनही विलीन झालेला नाही. त्यामुळे सभापतींनी दिलेला निवाडा अवैध व बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद काँग्रेसचे ज्येष्ठ वकील विवेक तांका यांनी मागील सुनावणीवेळी केला होता.

टांगती तलवार

काँग्रेस पक्षाच्या याचिकेत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स, मंत्री जेनिफर मोन्सेरात, आमदार बाबूश मोन्सेरात, आमदार क्लाफासिओ डायस, आमदार विल्फ्रेड डिसा, आमदार टोनी फर्नांडिस, आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, आमदार नीळकंठ हळर्णकर, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, तर मगोतर्फे दाखल केलेल्या याचिकेत मंत्री दीपक पाऊस्कर, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT