Goa University  Dainik Gomantak
गोवा

Film festival: विद्यापीठात फिल्म महोत्सव

सात लघुपट, पाच माहितीपटांचे होणार प्रदर्शन

दैनिक गोमन्तक

Goa University : गोवा विद्यापीठातील शणै गोंयबाब भाषा आणि साहित्य महाशाळेच्या कोकणी अध्ययन शाखेतर्फे सोमवार 11 सप्टेंबर रोजी एक दिवसीय ‘गोवा विद्यापीठ फिल्म महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ब्लॉक-बी, स्कूल ऑफ केमिकल्स सभागृहात आयोजित केलेल्या या महोत्सवांत गोवा विद्यापीठातील अध्ययन शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी निर्मित लघुपट आणि माहितीपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

विविध सत्रात सात लघुपट आणि पाच माहितीपट दाखवण्यात येणार असून आमंत्रित आणि उपस्थित मान्यवर आपले विचार मांडणार आहे. विद्यापीठ तसेच महाविद्यालय स्तरावरील लघुपट आणि माहितीपट हा विषय कौशल्य विकास विषय म्हणून शिकवण्यात येतो.

विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेल्या लघुपटांना योग्य व्यासपीठ मिळावे, प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन मिळावे या हेतूने फिल्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिग्दर्शक मकरंद माने यांच्या हस्ते सकाळी १०.३० वा. या महोत्सवाचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे.

उद्‍घाटन सत्राचे अध्यक्षस्थान गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन भूषवतील. तसेच शणै गोंयबाब भाषा आणि साहित्य महाशाळेच्या अधिष्ठाता प्रो. अनुराधा वागळे, कोकणी अध्ययन शाखेचे संचालक डॉ. हनुमंत चोपडेकर, महोत्सवाचे निमंत्रक डॉ. प्रकाश पर्येकर उपस्थित असतील.

उद्‍घाटन सत्रानंतर कोकणी अध्ययन शाखेच्या विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेल्या ‘आमी झाड जावया’ हे फिल्म आणि ‘मोटरसायकल पायलट अ गोवन प्रायड’ या माहितीपटाचा प्रिमीयर शो होणार आहे. सध्याकाळी ४.३० वाजता होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोकणी आणि मराठी फिल्म निर्माते आणि दिग्दर्शक राजेद्र तालक उपस्थित राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT