Electricity In Benaulim: बाणावलीतील वीजपुरवठा डिसेंबरपर्यंत होणार सुरळीत

ढवळीकर : वीज नेटवर्क नूतनीकरण कामाचे उद्‍घाटन
Goa Electricity Issue
Goa Electricity Issue Dainik Gomantak

Electricity In Benaulim: या वर्षाच्‍या डिसेंबरपर्यंत बाणावली मतदारसंघात वीजसुधारणा करण्‍यात येणार असून त्‍यासाठी 35 कोटी रुपयांची तरतूद करण्‍यात आली आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज जाहीर केले. कमी दाबाच्‍या व ११ कोटी रुपये खर्चाच्‍या वीज नेटवर्क नूतनीकरण कामाचे उद्‍घाटन केल्‍यानंतर ते बोलत होते.

Goa Electricity Issue
G20 New Delhi Summit: युद्धामुळे जगात विश्वासाचा अभाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढील सहा-सात महिन्यांत बाणावली मतदारसंघातील वीजेसंदर्भातील साधनसुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली जाईल. १९६३-६४ मध्ये जेव्हा प्रथमच वीजवाहिन्या घालण्यात आल्या, तेव्हापासून कोणीही त्या बदलण्याचा प्रयत्न केला नाही. आता आमचे सरकार १९६३ सालचे कंडक्टर्स बदलत आहे. त्यामुळे वीजप्रवाह सुरळीत होणे शक्य होत असल्याचे ढवळीकर म्हणाले.

आमदार व्हेंझी व्हिएगस म्हणाले, बाणावली हा किनारपट्टीतील गाव आहे. तो पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे चांगले समुद्रकिनारे आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत असणे गरजेचे आहे.

Goa Electricity Issue
CM Pramod Sawant: ‘हा’ सत्कार माझ्यासाठी परमभाग्याचा!

वीजपुरवठ्यासाठी तामनार प्रकल्प

वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी सांगितले की, वीज खात्याला नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. ज्याप्रमाणे काळ बदलतो त्याप्रमाणे सुधारणा केल्या जातात. पण काही लोक विरोध करतात. त्‍यामुळे विकास खुंटतो. गोवा स्वतः वीज तयार करीत नाही. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड या राज्यांतून गोव्याला वीजपुरवठा होत आहे. सुरळीत व अखंडित वीजपुरवठ्यासाठी तामनार प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे

बाणावली मतदारसंघातील वीजपुरवठ्यात सुधारणा व्‍हावी यासाठी आमदार व्हेंझी व्हिएगस प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज या कामाचा शुभारंभ झाला. लवकरच या मतदारसंघात भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम सुरू होईल. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे. सहकार्यामुळे लवकर काम पूर्ण होण्यास मदत होईल.

- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com