Film city Project  Dainik Gomantak
गोवा

Film City Project : भगवती पठारावर कोणताच प्रकल्प नको; फिल्म सिटीला विरोध

Film City Project : : लोलये-पोळेच्या ग्रामसभेत पुन्हा ठराव संमत

गोमन्तक डिजिटल टीम

Film City Project : काणकोण, लोलये-पोळेच्या ग्रामसभेत पुन्हा एकदा भगवती पठारावर कोणताच प्रकल्प नको, असा ठराव संमत करण्यात आला.

जैवविविधतेच्या बाबतीत समृद्ध असलेल्या या पठारावर अपारंपरिक व्यवसाय सुरू करण्यास पंचायत व सरकारने परवानगी देऊ नये, अशी मागणी या सभेत करण्यात आली. या सभेला दोनशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

फिल्म सिटी उभारण्यासाठी लोलये भगवती पठारावरील २० लाख चौरस मीटर जागा गोवा मनोरंजन सोसायटीला देण्यास लोलये कोमुनिदाद संस्थेने मंजुरी दिली आहे. मात्र ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध आहे.

डेनिस रिबेलो यांनी या विरोधातील ठराव ग्रामसभेत मांडला. जैवविविधता समितीचे अध्यक्ष मनोज प्रभुगावकर, माजी सरपंच शैलेश पागी, प्रशांत पागी आदी ग्रामस्थांनी या ठरावाला अनुमोदन दिले.

सरपंच निशा च्यारी यांनी भगवती पठारावर फिल्म सिटी प्रकल्प उभारण्याचा कोणताही प्रस्ताव पंचायतीकडे आला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच असा प्रस्ताव आल्यास तो ग्रामसभेसमोर ठेवण्यात येईल, असे सांगितले. हा विषय सभेच्या विषय पत्रिकेत नव्हता तरीही या विषयावर चर्चा करण्याची अनुमती सरपंच च्यारी यांनी अटीवर दिली.

मुख्यमंत्री, सभापती व समाजकल्याण मंत्री फिल्म सिटीबाबत भाष्य करीत असल्याने पंचायत मंडळ याबाबत काहीच ठाऊक नसल्याचे सांगू शकत नाही, असा दावा ग्रामस्थांनी यावेळी केला. ग्रामसभेत वेगवेगळ्या विषयावर झालेल्या चर्चेत अरुण वामन भट, प्रशांत पागी, कॅजी फर्नांडिस, शैलेश पागी व अन्य ग्रामस्थांनी भाग घेतला.

पट्टेरी वाघाचा अधिवास...

भगवती पठार जैवविविधतेच्या बाबतीत समृद्ध आहे. त्या भागात पट्टेरी वाघाचाही अधिवास आहे. लोलये पंचायत क्षेत्राच्या किमान तीन प्रभागांचा जलसंचय या पठारामुळे होतो, असे जैवविविधता समितीचे अध्यक्ष मनोज प्रभुगावकर यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT