Goa Fraud Case: डॉक्टरला घातला 8 लाखांना गंडा

Goa Fraud Case: तिघांवर गुन्हा : बँक अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक
Goa Fraud Case
Goa Fraud Case Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Fraud Case: थिवीमधील एका डॉक्टराची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणात सहभागी असलेल्या तिघांवर कोलवाळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Goa Fraud Case
Goa Politics: आणखी काही मंत्र्यांवर पदत्यागाची टांगती तलवार

पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, थिवी येथे क्लिनिक असलेल्या एका डॉक्टरला वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी 93 लाखांचे कर्ज घ्यायचे होते.

त्यासाठी त्यांनी संशयित सुशांत कंटक (रा. मडगाव) याच्याशी चर्चा केली. त्यानंतर संशयिताने डॉक्टरांची ओळख अनंत दत्ताराम वालावलकर (सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) यांच्याशी करून दिली.

Goa Fraud Case
Goa Petrol-Diesel Prices: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर किंमतींमध्ये वाढ; दक्षिण गोव्यातील दरांत घट

संशयित अनंतने आपण बँक अधिकारी असल्याचे भासवून या प्रकरणातील तिसरा संशयित कामत (रत्नागिरी, महाराष्ट्र) याची डॉक्टरांना ओळख करून दिली. आपण बँकेतर्फे कर्ज मंजुरीचे व्यवहार सांभाळत असल्याचे कामतने डॉक्टरांना सांगितले.

संशयितांनी डॉक्टरांना आपण बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांना गुंडाळले आणि अनंत वालावलकर याच्या वैयक्तिक खात्यामध्ये ८ लाख ६७ हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले.

...अन् विश्‍वास नडला

डॉक्टरांनी संशयितांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ८ लाख ६७ हजार रुपये अधिकृत बँक खात्यात जमा न करता आरोपीच्या वैयक्तिक खात्यात जमा केले.

मात्र, त्यानंतर संशयित कर्ज देण्यास असमर्थ ठरल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचा प्रकार डॉक्टरांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत या तिघांविरोधातही तक्रार दाखल केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com