Fight Between Two Group of Women Dainik Gomantak
गोवा

पर्वरीत मॉलबाहेर महिलांमध्ये तूफान हाणामारी! लाथा-बुक्क्यांनी मारहाण

चार महिलांविरोधात तक्रार दाखल

Kavya Powar

Fight Between Two Group of Women: पर्वरी येथील एका मॉलच्या पार्किंगमध्ये काही महिलांमध्ये वाद झाल्याचे समोर आले. या वादानंतर त्यांच्यात मारमारीदेखील झाली असून याबाबत 4 महिलांबद्दल पर्वरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, बस्तोडा येथे राहणाऱ्या 34 वर्षीय बेनडीता मार्टिन्स आणि तिच्या आईवर इतर 4 महिलांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. मॉलच्या पार्किंग एरियामध्ये समोरील गटातील एका महिलेने अपशब्द वापरला. याबाबत बेनडीताने जाब विचारला असता त्या दोघींमध्ये वाद झाला.

यावर अपशब्द वापरलेल्या महिलेच्या आईने आणि इतर महिलांनी बेनडीताला मारहाण केली. बेनडीता आणि तिची आई दोघींवरही या चार महिलांनी हल्ला केला, यामध्ये पीडितेच्या पोटात त्यांनी लाथा-बुक्के मारत तिला खाली पाडले आणि तिची बोटेही चावली.

या सर्व प्रकारानंतर पर्वरी पोलिसात त्या चार महिलांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: डिस्को लाईट्स अन् 'विरुष्का'चा नादखुळा डान्स! आरसीबीच्या बॅक-टू-बॅक विजयाचं तगडं सेलिब्रेशन; रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

Goa Pink Taxi: पिंक रिक्षानंतर आता महिलांसाठी 'पिंक टॅक्‍सी'; सहकार खाते प्रयत्‍नशील, बँकांशी सकारात्मक चर्चा

Goa Road Accident: 'थार'की मृत्युचा सापळा? आठवड्यात तिघांचा बळी, पाच महिन्यांत 101 रस्ते अपघाती मृत्यू

अय्‍यांनी खडक फोडून आणले पाणी; देशभरात गाजली जिद्दीची कहाणी! 'मन की बात'मध्‍ये पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक

इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा भीषण मारा; प्रत्युत्तरात अमेरिकेचे 'सेल्फ-डिफेन्स' हल्ले तर इस्रायलकडून हिजबुल्लाहवर बॉम्बवर्षाव

SCROLL FOR NEXT