Ferryboat Sinks At Chorao Dainik Gomantak
गोवा

Ferryboat Sinks In Goa: चोडण येथे फेरीबोट बुडाली; मोठा अनर्थ टळला

Ferryboat Sinks At Chorao: अग्निशमन दलाचे जवान पंपाच्या मदतीने बोटीतून पाणी बाहेर काढत आहेत. पाणी बाहेर काढल्यानंतर बोट अपोआप वरती येईल, असे नदी जलवाहतूक विभागाचे संचालक म्हणाले.

Pramod Yadav

चोडण: फेरीधक्क्यावर 'बेती' फेरी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. घटना घडली त्यावेळी सुदैवाने बोटीत कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. फेरीत दोन ते तीन कर्मचाऱ्यांच्या दुचाकी असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शीनी वर्तवली आहे. समोवारी (२३ जून) सकाळी चोडण येथे ही घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, बोटीतून पाणी बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोडण फेरी धक्क्यावर सोमवारी सकाळी फेरीबोट बुडाली सुदैवाने बोटीत कोण नसल्याने मोठा अपघात टळला. बोटी पाणी भरल्याने बोट बुडाल्याचे सांगितले जात आहे. पंपाच्या मदतीने अग्निशमन दलाचे जवान बोटीतून पाणी बाहेर काढत आहे. बोटीचा काही भाग अद्याप बाहेर आहे. बोटमधील टँकमध्ये पाणी भरल्याने बोट बुडाली असल्याचे सांगितले जात आहे.

नदी जलवाहतूक विभागाचे संचालक विक्रमसिंह एन. राजेभोसले यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. "बोटचा एक टँक पाण्याने भरल्याने बोट बुडाली असावी, पावसाचे पाणी बाहेर न काढल्याने हा अपघात झाला असावा, हे प्राथमिक दृष्ट्या दिसते," अशी माहिती राजेभोसले यांनी दिली आहे.

"अग्निशमन दलाचे जवान पंपाच्या मदतीने बोटीतून पाणी बाहेर काढत आहेत. पाणी बाहेर काढल्यानंतर बोट अपोआप वरती येईल," असे त्यांनी स्पष्ट केले. टँकमध्ये पाणी भरल्यानंतर बाहेर न काढल्यामुळे ही घटना घडली, असे म्हणत संचालकांनी बोटीवरील कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले आहे.

"फेरीबोट उत्तम काम करत होती. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे छिद्र नव्हते डेकवरुन बोटच्या टँकमध्ये पाणी गेल्यामुळे पाणी बाहेर पडणारी छिद्र बंद झाली आणि बोट बुडाली. अपघातावेळी बोटीत तीन दुचाकी होत्या," अशी माहिती राजेभोसले यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT