ferry boat in Goa Dainik Gomantak
गोवा

सारमानस‌ येथील फेरीबोट नादुरुस्त; प्रवाशांची होतेय गैरसोय

सारमानस-टोंक जलमार्गावर ताण: वाहनचालक, नागरिकांवर ताटकळत राहण्याची वेळ

दैनिक गोमन्तक

डिचोली: सारमानस-टोंक जलमार्गावरील एक फेरीबोट नादुरुस्त राहिल्याने आज (शुक्रवारी) या जलमार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. जलमार्गावर वाहतूक करणाऱ्या एकाच फेरीबोटीवरही दिवसभर वाहतुकीचा ताणही वाढला होता. मिळालेल्या माहितीनुसार या जलमार्गावर वाहतूक करणाऱ्या दोनपैकी एका फेरीबोटीचे ब्रेक निकामी झाल्याने ती दिवसभर बंद ठेवण्यात आली होती.

माशेल, फोंडा, पणजी आदी भागात जाणारे सारमानस, पिळगाव, डिचोली आदी भागातील अनेकजण सारमानस-टोंक जलमार्गावरून प्रवास करतात. रोज सकाळी दहा वाजेपर्यंत तरी या जलमार्गावर प्रचंड गर्दी असते. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक फेरीबोट नादुरुस्त राहिल्याने प्रवाशांची हालत झाली. प्रवासी आणि वाहने सारमानस फेरीधक्क्यावर बराचवेळ अडकून पडली. वाहनांच्या रांगा लागल्या. काहीनी तर अडकून राहण्यापेक्षा वाहने माघारी फिरवून अन्य मार्गाने जाणे पसंद केले.

टोंक फेरीधक्क्याच्या बाजूनेही अशीच स्थिती निर्माण झाली होती. यामुळे नियोजित वेळेत इश्चित स्थळ गाठणे अशक्य झाल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

सुस्थितीतील फेरीबोट हवी

अधूनमधून एक फेरीबोट नादुरुस्त झाली की, या जलमार्गावर प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची माहिती पंच निलेश जल्मी आणि अनिल नाईक यांनी दिली. सरकारने जलमार्गावरील प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी सुस्थितीतील फेरीबोटी उपलब्ध कराव्यात, अशी मागणी जल्मी व नाईक यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT