म्हापसा मासळी मार्केटबाबत कार्यवाही

दुर्गंधी पसरली: म्हापसा पालिका, आरोग्य केंद्रातर्फे दखल
म्हापसा मासळी बाजार
म्हापसा मासळी बाजारDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: म्हापसा शहरातील दुर्गंधीयुक्त मासळी मार्केट प्रकल्पाबाबत अखेर येथील नागरी आरोग्य केंद्राने कार्यवाही सुरू केली आहे. या प्रकल्पाची मालकी म्हापसा पालिकेकडे असून, या पूर्वी कित्येकांनी गेल्या सुमारे दोन-तीन वर्षांपासून या विषयासंदर्भात तक्रारी केल्या असतानाही त्याबाबत आरोग्य केंद्राने फारसे मनावर घेतले नव्हते.

मासळी मार्केट प्रकल्पाच्या बाहेर असलेल्या तुंबलेला कचरा आणि मासळीच्या कुजकट सांडपाण्यासंदर्भात आल्त धुळेर म्हापसा येथील प्रवीण आसोलकर यांनी अलीकडेच तक्रार सादर केल्यानंतर त्याबाबत म्हापसा नागरी आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल वरिष्ठांना सादर केला होता. यासंदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांनीही कार्यवाहीबाबत म्हापसा आरोग्य केंद्राला निर्देश दिले होते. आता म्हापसा पालिका व आरोग्य केंद्र यांच्यातर्फे सोमवार 16 रोजी सकाळी 11 वाजता पालिका व आरोग्य केंद्र यांच्यातर्फे संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे.

म्हापसा मासळी बाजार
बेतूलात दोन गटांत वाद; दर्ग्याला टाळे

यासंदर्भात म्हापशाच्या आरोग्याधिकारी डॉ. शेरेल डिसोझा यांनी म्हापसा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला असून, संयुक्त पाहणीवेळी पालिकेचा अधिकारी पाठवण्याची सूचना केली आहे. या समस्येसंदर्भात श्री. आसोलकर यांनी म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा, म्हापसा नागरी आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी सीताराम सावळ व उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.

मासळी प्रकल्पाच्या बाहेर असलेल्या छोटेखानी कपेलाच्या परिसरात ही समस्या निर्माण झाली असून तो परिसर दुर्गंधीमय झाल्याने तसेच ते मासळीचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने बाजारपेठेत येणाऱ्या लोकांना ते त्रासदायक ठरत आहे. या समस्येमुळे म्हापसा शहरात आरोग्यविषयक समस्या उद्‍भवून रोगराई निर्माण होऊ शकते असे श्री. आसोलकर यांनी संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले होते.

म्हापसा मासळी बाजार
‘कासारवर्णे’च्या रुग्णवाहिकांना लागला गंज...

आरोग्य केंद्राचा अहवाल

म्हापसा येथील नागरी आरोग्य केंद्राच्या स्वच्छता निरीक्षकांनी ६ मे रोजी मासळी माकेंट प्रकल्प परिसराची पाहणी केली होती. त्या भागात कुजकट टाकावू पदार्थांमुळे पाणी साचलेल्या अवस्थेत आहे व माती, रेती, प्लास्टिक बॅग्स इत्यादींमुळे ओहोळातील सांडपाण्याचा प्रवाह खंडित झाल्याचे त्यांना आढळून आले. तसेच, ही स्थिती तमाम जनतेला ते त्रासदायक ठरत असून, आरोग्याच्या दृष्टीनेही ते धोकादायक असल्याचा अहवाल त्यांनी पाठवला आहे.

मासळी मार्केट प्रकल्पाच्या शेजारील परिसरात टाकाऊ पदार्थ आणि सांडपाणी यांमुळे मच्छरांची पैदास होऊन डेंग्यू, मलेरिया इत्यादी रोगराईचा उद्‍गम व फैलाव होऊ शकतो, असे मी लेखी निवेदनातून शासकीय यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, ही अपेक्षा आहे.

- प्रवीण आसोलकर, तक्रारदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com