Kadamba Bus Dainik Gomantak
गोवा

कदंब प्रवासाची धास्ती वाढली; म्हापशात बसची चाकच निखळली

कदंब बसच्या देखभाल आणि दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; प्रवाशांचा जीव धोक्यात

दैनिक गोमन्तक

पणजी : डिझेल संपल्यामुळे बस बंद पडल्याची घटना ताजी असतानाच कदंब प्रशासनाचा आणखी एक बेजबाबदारपणा समोर आला आहे. बदामी कर्नाटकहून पणजीला परतत असलेल्या कदंब बसचे टायर धुळेर म्हापसा येथे अचानक बाहेर आहे. बसचा वेग कमी असल्याने सुदैवाने जिवितहानी टळली आहे. मात्र कदंबचा प्रवास कितपत सुरक्षित यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

गोव्यातून शेजारच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात चांगल्या दर्जाच्या बस पाठवल्या जातात. मुंबई, पुणे, शिर्डी, बंगळुरु, म्हैसूर यासारख्या मार्गावर कदंबकडून वातानुकुलीत आराम बससेवा पुरवली जाते. कर्नाटकमध्ये लांब पल्ल्यासाठी विनावातानुकुलीत मात्र चांगल्या बस दिल्या जातात. मात्र याच बसची निट दुरुस्ती किंवा देखभाल होत नसल्याने आता लांब पल्ल्याचा कदंबचा प्रवास किती सुरक्षित असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

फोंड्याजवळ असलेल्या आर्ल- केरी सावईवेरे मार्गावरील कदंब बसगाडी डिझेल अभावी बंद पडली होती. या घटनेमुळे प्रवाशांना भररस्त्यात नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र याची कदंब महामंडळाचे चेअरमन उल्हास नाईक तुयेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. कदंब बसच्या चालकाला महामंडळाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. डिझेल न भरताच बसगाडी घेऊन जाण्याच्या बेजबाबदार कृतीबाबत चालकावर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT