Fear of a bomb in a scooter created panic in Margaon Dainik Gomantak
गोवा

Margaon Crime: स्कूटरमधील ‘बीप’आवाज अन् उडाला एकच गोंधळ, मडगावात नेमकं काय घडले?

Margaon Crime: ज्या दुकानासमोर ही स्कूटर ठेवण्यात आली होती, त्या दुकानदाराने आवाज ऐकल्यावर आपत्कालीन सेवा क्रमांकावर फोन केला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव रेल्वे उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या एका दुकानाजवळ पार्क केलेल्या स्कूटरमधून अचानक बीप,बीप,असा आवाज येऊ लागल्याने ‘त्या’ स्कूटरमध्ये बॉम्ब तर ठेवला नाही ना, या भीतीने काही लोकांची गाळण उडाली. पण नंतर सेन्सरमध्ये बिघाड झाल्याने हा आवाज ऐकू येतो, हे कळून आल्यावर लोकांचा जीव भांड्यात पडला.

दरम्यान, ज्या दुकानासमोर ही स्कूटर ठेवण्यात आली होती, त्या दुकानदाराने आवाज ऐकल्यावर आपत्कालीन सेवा क्रमांकावर फोन केला. हा फोन पणजी येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयात लागला. त्यांनी या प्रकाराची कल्पना मडगाव कार्यालयाला दिल्यामुळे मडगाव येथील अधिकारी गिल सोझा घटनास्थळी दाखल झाले.

नंतर त्यांनी मडगाव पोलिसांशी संपर्क साधला. शेवटीं हा आवाज त्या इलेक्ट्रिक स्कूटरचा सेन्सर बिघडल्याने येत असल्याचे लक्षात आल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: प्रवाशांच्या जीवाशी खेळ! एसी डब्यात सिगारेट ओढणाऱ्या तरुणीचा हंगामा; प्रवाशांनी विरोध करताच सुरु झाली बाचाबाची

Duleep Trophy 2025 Final: 11 वर्षांनंतर सेंट्रल झोनच्या झोळीत दुलीप ट्रॉफी, अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा 6 विकेट्सने पराभव

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

Viral Video: 1997 साली जमिनीखाली गाडलं गेलेलं जलजीराचे पॅकेट 27 वर्षानंतर जसंच्या तसं सापडलं, नेटकरी म्हणाले, 'Don't Use Plastic'

Curchorem: ...तर पालिकेसमोरच मासळी विक्री करू! कुडचडेतील पारंपरिक विक्रेत्‍यांचा इशारा; बेकायदेशीर विक्रीमुळे असंतोष

SCROLL FOR NEXT