Margaon Municipality: ... तर मग वाट कसली पाहता? काकोडा प्रकल्पप्रश्नी खंडपीठाने सरकारला सुनावले

सरकारला कानपिचक्या : कचरा विल्हेवाटीसाठी त्वरित पावले उचला
Court
Court Dainik Gomantak

Margaon Municipality : सोनसडो कचरा व्यवस्थापन संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी सुरू झाल्यासंदर्भातचा अहवाल आज मडगाव पालिकेने सादर केला. काकोडा येथील सुमारे शंभर टन कचरा विल्हेवाट करण्याची क्षमता असलेल्या कचरा प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास त्याच्या उद्‍घाटनाची वाट का पाहता,

असा प्रश्न उपस्थित करीत सोनसोडा येथील कचरा विल्हेवाटीसाठी तेथे स्थलांतर करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अशा शब्दांत आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला सुनावले.

मडगाव पालिकेचा दैनंदिन जमा होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात उच्च न्यायालयाने मडगाव पालिकेला निर्देश दिले होते. त्याच्या कामाचा अहवाल मुख्याधिकाऱ्यांना आज सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी तो न्यायालयासमोर सादर केला.

दैनंदिन कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भाच्या कामाचा अहवाल पालिकेतर्फे नगरविकास सचिवांना सादर करण्यात येत आहे.

कचरा व्यवस्थापन महामंडळाला एक बेलिंग मशीन देण्यासाठी विनंती करण्यात आली आहे व एमआरएफच्या शेडच्या कामाचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर दोन बेलिंग मशीनसाठी विनंती केली जाईल.

दरम्यान, काकोडा येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कचरा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे असल्यास मडगाव येथील हा कचरा विल्हेवाट प्रश्‍न कायमचा सुटू शकतो असे खंडपीठाने तोंडी निरीक्षण केले. हा प्रकल्प उद्‍घाटनाच्या प्रतिक्षेत आहे.

Court
Goa Monsoon 2023: राज्याला पावसाने झोडपले; आतापर्यंत 70 इंच बरसला...

या १०० मेट्रिक टन कचरा विल्हेवाट प्रकल्पासाठी तेवढा कचरा मिळत नाही अशी याचिकादाराच्या वकिलांनी माहिती सुनावणीवेळी दिली असता खंडपीठाने सरकारला त्या प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे असा प्रश्‍न केला. विलंब न करता मडगावातील कचरा प्रश्‍न सोडवण्याबाबत विचार करावा, अशी तोंडी सूचना केली.

प्रगती अहवाल सादर करा

उच्च न्यायालयाने या अहवालाबाबत प्रथमदर्शनी समाधान व्यक्त करून पुढील आठवड्यात या कामाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.

सोनसडोची सद्यस्थिती

सोनसोडोच्या ठिकाणी सध्या ६२.५ केव्हीए क्षमतेचा जनरेटर भाडेपट्टीवर घेऊन तो तेथे ठेवण्यात आला असून त्या ठिकाणी बंद असलेले तात्पुरते वीज कनेक्शन घेऊन वीजप्रवाह सुरू करण्यात आला आहे.

Court
Goa News | उगवे येथे बेकायदेशीर वाळू उपसणे सुरु - स्थानिक | Gomantak TV

सध्या सोनसडो येथे असलेल्या शेडचे व एमआरएफ कामाचा अहवाल दिला जात आहे. तेथे असलेल्या १० हजार मेट्रीक टन कचऱ्यापैकी ५ हजार मेट्रीक टन कचरा पालिकेच्या तेथील शेडमध्ये आहे तो स्थलांतर करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे.

हा कचरा उलचण्याचे काम सुरू झाले असून जेसीबी व चेनलोडर (पोकलेन) भाडेपट्टीवर घेण्यात आले आहे.

चार अभियंत्यांची नेमणूक

सोनसडोच्या ठिकाणी ४ अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अभियंते तेथे आळीपाळीने २४ तास तैनात करण्यात आले असून सोनसडो येथील जागेत संरक्षक भिंत तसेच इतर कामासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वापर करून काम सुरू करण्यात आले आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com