Mapusa FDA Raid Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: ‘एफडीए’चा धडाका! २.५ लाखांचा माल जप्त; अस्वच्छ मिठाई युनिट बंद करण्याचे निर्देश

Mapusa Raid: विनापरवाना हे युनिट थाटल्याबद्दल संबंधित व्यवसायिकाला काम बंद ठेवण्याची नोटीस जारी करून युनिट त्वरित बंद करण्याचे निर्देश

गोमन्तक डिजिटल टीम

Goa FDA Raid

म्हापसा: अन्न व औषधे प्रशासनाने (एफडीए) पुन्हा एकदा म्हापसा नवीन आंतरराज्य बसस्थानक तसेच वेर्ला-काणका येथील एका मिठाई युनिटवर छापा टाकला. यावेळी अंदाजे २.५ लाख रुपयांचा माल जप्त केला. वेर्ला येथे अस्वच्छ जागेत चालणारे मिठाई युनिट बंद करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले.

बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. पहिल्यांदा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हापसा आंतरराज्य बसस्थानकावर छापा टाकला. यावेळी शेजारील राज्यातून विनालेबल आलेला मसाला, बिस्किटे व इतर माल अधिकाऱ्यांना आढळून आला. या १ लाखांच्या जप्त केलेल्या वस्तूंची म्हापसा पालिकेच्या साहाय्याने विल्हेवाट लावण्यात आली.

दरम्यान, या कारवाईवेळी प्रशासनाला वेर्ला-काणका येथे एका खोलीमध्ये अस्वच्छ अशा जागी मिठाई व फरसाण तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार प्रशासनाच्या पथकाने त्या युनिटवर छापा टाकला. विनापरवाना हे युनिट थाटल्याबद्दल संबंधित व्यवसायिकाला काम बंद ठेवण्याची नोटीस जारी करून हे युनिट त्वरित बंद करण्याचे निर्देश प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिले.

जनजागृतीसाठी मोहीम

प्रशासनाकडून बाहेरील राज्यातून वाहतुकीमार्गे आलेल्या मालाचा दर्जा तपासण्यासाठी राबवलेली ही आठवी कारवाई आहे. स्वच्छ तसेच दर्जात्मक खाद्यपदार्थांच्या वस्तूंचा पुरवठा राज्यात व्हावा, यादृष्टीने जनजागृतीसाठी प्रशासनाकडून ही मोहीम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT