मडगाव: सासष्टीत गुरुवारी ‘एफएसएसएआय २००६’ आणि त्याखालील नियमांचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोहीम राबविली. यावेळी मांडोप-नावेली येथील एका आवारात सुमारे १५ किलो मिश्र शेव इत्यादी फरसाणाचा अंदाजे ३८०० रुपये किमतीचा साठा ‘एफएसएसएआय’ मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य लेबलशिवाय आढळला.
तसेच कालबाह्य झालेला गोड हलवा अंदाजे २० किलो सापडला. त्याची साठवण योग्यप्रकारे केली नव्हती आणि त्याची किंमत अंदाजे ५६०० रुपये इतकी हाेती. या सर्व साठ्यांची सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नंतर विल्हेवाट लावण्यात आली.
या मोहिमेत वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी प्रिया देसाई, अमित मांद्रेकर, स्नेहा नाईक, अभिषेक नाईक यांचा समावेश होता. संचालक श्वेता देसाई व अधिकारी संज्योत कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.