FDA Goa Raid Dainik Gomantak
गोवा

FDA Goa Raid: एफडीएची मोठी कारवाई! पर्वरीत 700 किलो 'बनावट' पनीर जप्त; अवैध रिपॅकेजिंगचा पर्दाफाश VIDEO

FDA Seized 700 kg Paneer In Porvorim: अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पर्वरी येथे मोठी धडक कारवाई करत सुमारे 700 किलोग्रॅम 'बनावट' पनीरचा साठा जप्त केला.

Manish Jadhav

FDA Seized 700 kg Paneer In Porvorim: अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पर्वरी येथे मोठी धडक कारवाई करत सुमारे 700 किलोग्रॅम 'बनावट' पनीरचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे गोव्यात सुरु असलेल्या पनीरच्या अवैध रिपॅकेजिंग रॅकेटचा पर्दाफाश झाला असून अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

एफडीए अधिकाऱ्यांची कारवाई

एफडीए अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पर्वरी येथील या युनिटवर छापा टाकला. तपासणीदरम्यान, येथे मोठ्या प्रमाणावर पनीरची बेकायदेशीरपणे रिपॅकेजिंग केली जात असल्याचे आढळले. या पनीरवर बनावट लेबल लावण्याचे काम सुरु होते. या लेबलवर पनीरची गुणवत्ता, ब्रँड आणि उत्पादन तारीख चुकीची नमूद केली जात होती.

अशा प्रकारे रिपॅकेजिंग केलेले पनीर निकृष्ट दर्जाचे किंवा मुदत उलटून गेलेले असण्याची शक्यता असते. हे पनीर ग्राहकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरु शकते. या युनिटमधून गोव्यातील अनेक मोठ्या खाद्य व्यवसायांना नियमितपणे पनीरचा (Paneer) पुरवठा केला जात होता. हे युनिट राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग व्यवसायांसाठी पनीरचा प्रमुख स्रोत होते.

पुढील तपास सुरु

एफडीएने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल हे संपूर्ण युनिट तात्काळ सील केले. एफडीएने हे बनावट पनीर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. या पनीरचा मूळ स्रोत काय, ते कुठून आणले जात होते आणि बनावट लेबल कुठे तयार केली जात होती, याबद्दल सखोल चौकशी सुरु आहे. ज्या मोठ्या खाद्य व्यवसायांना हे बनावट पनीर पुरवले जात होते, त्यांच्यावरही लवकरच कारवाईची शक्यता आहे. एफडीएच्या या कारवाईमुळे गोव्यातील (Goa) खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख- समाजाच्या संवेदनांची हत्या..! क्लब मालक, अधिकारी अन् नियंत्रण यंत्रणांच्या कुचराईत 25 निष्पाप जिवांनी गमावला जीव

दारु प्यायली, फ्रिजमधील खाद्यपदार्थ खाल्ले अन् पैसे, सोन्याचे दागिने चोरुन पसार झाले; पाजीफोंड येथे 9 लाखांची चोरी

पर्यटन हवयं, मृत्यूचा नंगानाच नको! गोव्यातील क्लब, पब्जसाठी ठोस कायद्याची गरज; 'करमणुकीचा कार्यक्रम' ही पळवाट बंद करा- संपादकीय

'इंडिगो'चा अहंकार अन् केंद्राचे लोटांगण! नियम मोडल्याने देशातील लाखो प्रवाशांना 'मनस्ताप'; सरकारवरही ओढावली नामुष्की-संपादकीय

Goa Crime: 'तलवार बाळगणे म्हणजे प्रतिबंधित शस्त्र नव्हे'! कोर्टाने केली दोन आरोपींची सुटका; पोलिसांचे फेटाळले आरोप

SCROLL FOR NEXT