Old Goa Feast Dainik Gomantak
गोवा

Old Goa Feast: फेस्तमध्ये निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ; FDA चा छापा, अनेक स्टॉल सील

बिर्यानी, चाट, बर्फाचे गोळे, शरबत, कबाबच्या स्टॉलवर अस्वच्छता

Pramod Yadav

अन्न आणि औषध प्रशासन मागील काही दिवसांपासून अॅक्शनमोड मध्ये आले आहे. अस्वच्छ पद्धतीने केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थ स्टॉलवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सध्या ओल्ड गोव्यात (Old Goa Feast) सुरू असलेल्या फेस्तमध्ये देखील FDA (Food And Drug Association) च्या वतीने (गुरूवारी) छापा टाकत, खाद्यपदार्थ स्टॉलची पाहणी केली. यावेळी निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ करणाऱ्या स्टॉलवर FDA ने कारवाई केली आहे.

Old Goa Feast

अन्न आणि औषध प्रशासन तसेच पंचायतीच्या वतीने दिलेल्या सूचनांचे पालन स्टॉल धारकांकडून केले जात नसल्याचे प्रशासनाच्या पाहणीत लक्षात आले. बिर्यानी, चाट, बर्फाचे गोळे, शरबत, कबाब यासारख्या स्टॉल धारकांनी स्टॉलवरती अस्वच्छता आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थांसाठी योग्य काळजी घेतली नाही. त्यामुळे FDA ने 13 स्टॉलवरती कारवाई करत स्टॉल बंद केले आहेत.

Old Goa Feast

FDA च्या वतीने कोर्लीच्या आरोग्य अधिकारी आणि ओल्ड गोवा पोलिसांना फेस्तमधील खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर लक्ष ठेवण्याची तसेच, वारंवार तपासणी करण्याची सूचना केली आहे. तसेच, 02 आणि 03 डिसेंबर रोजी देखील FDA च्या वतीने फेस्तमध्ये स्टॉलची तपासणी केली जाणार आहे.

वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील आणि अन्न सुरक्षा अधिकारी अतुल देसाई विश्वास राव आणि नोसिन मुल्ला यांनी ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By- Election: आम्ही चालवू पुढे 'बाबां'चा वारसा! रितेशनी घेतला रवींच्या कार्यालयाचा ताबा, उमेदवारीबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! कोकण रेल्वे स्टेशनजवळ दुचाकींच्या धडकेत पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आरोपी फरार

Goa Today's News Live: गोव्याचा 'अभिनव' पुन्हा चमकला, पंजाबविरुद्ध झळकावलं दमदार शतक!

Amazon Layoffs: टेक विश्वात खळबळ! ॲमेझॉनने 14 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, दोन टेक्स्ट मेसेज पाठवून केली सर्वात मोठी कर्मचारी कपात

Viral Video: आधी ट्रेनची काच लखलखीत, मग रुळावर 'ती' कृती... तरूणीचा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी गोंधळात

SCROLL FOR NEXT