Mapusa FDA Raid Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: बेकायदेशीर चिकन विक्रीवर 'एफडीए'चा बडगा, म्हापशातील 3 दुकानांना ठोकलं टाळं

Mapusa FDA Raid: हाऊसिंग बोर्ड मोहिमेदरम्यान, तीन चिकन स्टॉल्स एफडीए परवान्याशिवाय अस्वच्छ परिस्थितीत कार्यरत असल्याचे आढळून आले.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.१५) मोहीम राबवत, अस्वच्छ तसेच योग्य कचरा विल्हेवाट न लावता चालणारी तीन चिकन सेंटर बंद करण्याचे निर्देश दिले. याशिवाय, म्हापसा पालिकेच्या सहकार्याने ६७ हजार रुपयांची आईस कँडीदेखील नष्ट करण्यात आली.

गुरुवारी, म्हापसा शहरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी हाउसिंग बोर्ड परिसर, म्हापसा तार पूल परिसर आणि खोर्ली येथील १३ जागांची तपासणी करण्यात आली.

हाऊसिंग बोर्ड मोहिमेदरम्यान, तीन चिकन स्टॉल्स एफडीए परवान्याशिवाय अस्वच्छ परिस्थितीत कार्यरत असल्याचे आढळून आले. हे स्टॉल्स बंद करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले.

त्याचप्रमाणे, खोर्ली येथील एका जागेची देखील तपासणी केली जिथे योग्य परिस्थिती न ठेवता बर्फाच्या कँडीचा साठा असलेले सुमारे २५० बॉक्स जप्त करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT