FDA Raid Calangute  Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: बेकायदेशीरपणे बिर्याणी विकणाऱ्यांची 'हकालपट्टी'; कळंगुट किनाऱ्यावर एफडीएची 'छापेमारी'

Illegal Biryani Seized: काही विक्रेते मोठमोठाल्या हॉटेल्स समोर अशी दुकानं चालवताना आढळून आले, त्यांच्याजवळ कोणतेही वैध परवाने नाहीत

Akshata Chhatre

Food safety raid in Calangute Goa

म्हापसा: कळंगुट परिसरात बेकायदेशीरपणे आणि अस्वच्छ भागात बिर्याणी विकणाऱ्या दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाचे संचालकांच्या आदेशानुसार अधिकारी रिचर्ड नर्होना यांच्या देखरेखीखाली ही मोहीम पार पाडण्यात आली. काही विक्रेते मोठमोठाल्या हॉटेल्स समोर अशी दुकानं चालवताना आढळून आले, त्यांच्याजवळ कोणतेही वैध परवाने नाहीत. अस्वच्छ परिसरात बिर्याणी तयार करून स्थानिक तसेच पर्यटकांच्या जीवाला यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली .

अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी रिचर्ड नर्होना यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या विक्रेत्यांजवळ अन्न व औषध प्रशासनाकडून जारी करण्यात आलेला कोणताही वैध परवाना नाही. कळंगुट परिसरातील काही छोट्या-मोठ्या हॉटेल्सनी अशा विक्रेत्यांना व्यवसाय चालवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे उघडकीस आले.

या व्यवसायांना कळंगुट पंचायतीकडून देखील कोणताही परवानगी दिली गेलेली नाही. यावर पूर्वी देखील कारवाई करण्यात आली होती मात्र डिसेंबरच्या काळात पर्यटकांची संख्या वाढताच पुन्हा हा प्रकार सुरु झाल्याचे दिसून आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत सर्व प्रकारचे अवैध सामान जप्त करण्यात आले आहे आणि यापुढे देखील अशी धडक कारवाई केली जाईल अशी माहिती रिचर्ड नर्होना यांनी दिली. तसेच त्यांनी स्थानिक हॉटेल मालकांना कोणत्याही बेकायदेशीर व्यावसायिकांना थारा न देण्याचं आवाहन केलंय आणि असं न केल्यास पुढच्यावेळी नक्कीच यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. संपूर्ण समुद्रपट्टीवर ही धडक कारवाई होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT