Goa food safety raid Dainik Gomantak
गोवा

FDA Raid Goa: 'चॉकलेट ॲनालॉग'चा काळाबाजार उघड! FDA ने सापळा रचून पकडले; डिचोली-कळंगुटमध्ये तपासणी

FDA inspection Goa: केरी येथील एका आस्थापनाला अस्वच्छतेमुळे व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत

Akshata Chhatre

पणजी: उत्तर गोवा अन्न व औषध प्रशासन विभागाने मंगळवार (दि.२७) रोजी डिचोली आणि कळंगुट परिसरात जोरदार तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत एकूण सहा आस्थापनांची तपासणी करण्यात आली, ज्यापैकी चार जणांना सुधारणा करण्याच्या नोटीस बजावण्यात आली आहेत. केरी येथील एका आस्थापनाला अस्वच्छतेमुळे व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत, तर एका फ्रोजन डेझर्ट उत्पादकाला ५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

'चॉकलेट ॲनालॉग'च्या पुरवठादाराला अटक

या तपासणी मोहिमेदरम्यान, एफडीएच्या पथकाने 'चॉकलेट ॲनालॉग'च्या एका मोठ्या आणि अनधिकृत पुरवठादारावरही कारवाई केली. हा पुरवठादार कोणत्याही परवान्याशिवाय व्यवसाय करत होता आणि बिलांवर तसेच उत्पादनांच्या लेबल्सवर चुकीचा पत्ता नमूद करून ग्राहक आणि प्रशासनाची दिशाभूल करत होता. याचा मुख्य उद्देश कारवाईपासून वाचणे हाच होता.

एफडीए पथकाने सापळा रचून या पुरवठादाराला संभाव्य ग्राहक म्हणून पकडले. कळंगुटमधील आयडा मारिया रिसॉर्ट इमारतीजवळ, एचडीएफसी बँकेशेजारी महिमा ट्रेडर्स नावाने चालवला जाणारा हा अनधिकृत व्यवसाय रात्री उशिरापर्यंत शोधण्यात आला.

गौरव लखाणा नावाचा व्यक्ती या व्यवसायाचा मालक असून, तो चॉकलेट ॲनालॉग आणि इतर वस्तूंचे वितरण व पुनर्पॅकिंग करत होता. विशेष म्हणजे, कारवाई करताना या मालकाने सहकार्य करण्यास नकार दिला.

एफडीए पथकात कोण होते?

या कारवाईत एफडीएच्या पथकात नियुक्त अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील, डारलान दिवकर, बुधो गुरव, अमित मांद्रेकर, स्नेहा गावडे आणि नौसिन मुल्ला यांचा समावेश होता. एफडीएच्या या कारवाईमुळे अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक बसणार असून, ग्राहकांना चांगल्या दर्जाची उत्पादने मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

SCROLL FOR NEXT