Goa FDA Raid Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: नवीन वर्षात एफडीएचा धडाका! बोडगेश्वर जत्रोत्सवात 41 स्टॉल्सची तपासणी; कवळे-मुरगाव येथेही कारवाई

Goa FDA Raid: राज्यातील नागरिकांना सुरक्षित व आरोग्यदायी अन्न मिळावे या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या काही दिवसांपासून राज्यभर तपासणी मोहीम राबवली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : राज्यातील नागरिकांना सुरक्षित व आरोग्यदायी अन्न मिळावे या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या काही दिवसांपासून राज्यभर तपासणी मोहीम राबवली आहे.

म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवासह मुरगाव आणि फोंडा तालुक्यात केलेल्या कारवाईत अनेक विनापरवाना तसेच अस्वच्छ खाद्यपदार्थ स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, ही माहिती एफडीए संचालक श्वेता देसाई यांनी दिली.

म्हापशातील प्रसिद्ध श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवात एफडीएच्या पथकाने ४१ खाद्यपदार्थ स्टॉल्सची तपासणी केली. यामध्ये एफएसएसएआय नोंदणी नसलेल्या तसेच स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या ९ स्टॉल्सना तातडीने कामकाज बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

यामध्ये तयार खाद्यपदार्थांचा १, लोणच्यांचे ३, ‘पोटॅटो ट्विस्टर’चे २ आणि आईस गोळ्यांचे ३ स्टॉल्सचा समावेश आहे. तसेच हानिकारक रंगांच्या वापराच्या संशयावरून ‘कॉटन कॅन्डी’ विक्रेत्यांना मज्जाव करण्यात आला असून त्यांच्या मशिन जप्त करण्यात आल्या आहेत.

कवळे–खांडेपार परिसरातही कारवाई

८ जानेवारी रोजी फोंडा, कवळे व खांडेपार परिसरात राबवलेल्या मोहिमेत स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या आणि वैध नोंदणी प्रमाणपत्र नसलेल्या ४ खाद्य व्यावसायिकांवर एकूण ८,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यापूर्वी कलम ३१ अंतर्गत नोटिसा देऊनही सुधारणा न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. याशिवाय ‘नो स्मोकिंग’ फलक न लावल्याबद्दल २ प्रतिष्ठानांना ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, ३ इतर व्यावसायिकांना त्रुटी सुधारण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

मुरगावात ६ आस्थापनांना नोटिसा

६ जानेवारी रोजी मुरगाव तालुक्यात झालेल्या कारवाईत परवाना नसलेल्या ६ आस्थापनांना (यात २ चिकन दुकाने समाविष्ट) नोटिसा बजावण्यात आल्या. स्वच्छतेच्या अभावामुळे दोन गाड्यांसह इतर व्यावसायिकांवर ८,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४ आस्थापनांकडून ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी अन्नाचे ३ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: "आता प्रत्येक पोलीस ठाण्यात बीट कॉन्स्टेबल्सना मिळणार बाईक्स"

Crime News: धक्कादायक! मायणा- कुडतरीत अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

Crime News: गोव्यात भरदिवसा थरार! पर्रा येथे प्रेमप्रकरणातून चाकू हल्ला; दोन तरुण जखमी

हवामानाचा लहरीपणा, आंबा-काजू पीक संकटात? बागायतदारांची धाकधूक वाढली

Margao Cuncolim Road: कुंकळ्ळी -चिंचोणे ग्रामस्थ उतरले रस्त्यावर! महामार्ग रुंदीकरणास विरोध; घरे, वस्ती नष्ट होण्याची भीती व्यक्त

SCROLL FOR NEXT