FDA action Mapusa Banana Seizure Dainik Gomantak
गोवा

Mapusa FDA Raid: वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई! म्हापशात दीड टन केळी जप्त; पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर

Banana FDA Raid: एफडीएने बार्देश तालुक्यातील आपली दक्षता मोहीम सुरूच ठेवली असून म्हापसा मार्केट सबयार्डमधील रसायन वापरून कृत्रिमरीत्या पिकवलेली दीड टनपेक्षा जास्त केळी जप्त केली.

Sameer Panditrao

म्हापसा: एफडीएने बार्देश तालुक्यातील आपली दक्षता मोहीम सुरूच ठेवली असून म्हापसा मार्केट सबयार्डमधील रसायन वापरून कृत्रिमरीत्या पिकवलेली दीड टनपेक्षा जास्त केळी जप्त केली. तसेच त्यांचे नमुने घेण्यात आले. याशिवाय करासवाडा व थिवी येथील सहा मांस दुकानांची तपासणी केली. त्यापैकी दोन दुकाने अस्वच्छतेच्या कारणास्तव बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वट पौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात म्हापसा मार्केट सब यार्डमध्ये विक्रेत्यांकडून केळी तसेच इतर फळे कृत्रिमरीत्या घातक रसायनाचा वापर करून पिकवली जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी १० दुकानांची पाहणी केली. केळी विक्रीचा स्टॉल चालवणाऱ्या मोहम्मद नामक व्यक्तीच्या मालकीच्या दुकानामध्ये संशयास्पद द्रव्य आढळले. त्यामुळे या दुकानातील सुमारे दीड टनापेक्षा जास्त केळी जप्त करण्यात आली.

तसेच दुकान आणि भट्टी सील करण्यात आली. केळ्यांचे नमुने प्रयोगशाळेत पुष्टीसाठी पाठवण्यात आले आहेत. या मालाची तपासणी सकारात्मक आली तर तो नष्ट केला जाईल. तसेच मार्केट सब यार्डमधून या विक्रेत्याला काढून टाकण्याची सूचना संबंधित प्राधिकरणाकडे केली जाईल. तसेच सोप्यावर बसून केळी विक्री करणाऱ्या श्रीनिवास कादेमणी यांच्याकडील २५० किलो केळ्यांमध्ये संशयास्पद द्रव्य आढळले.

सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी ही केळी त्वरित जप्त करण्यात आली. यावेळी आंबे तसेच केळ्यांचे नमुने देखील एफडीएच्या पथकाने घेतले. एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील, अमित मांद्रेकर व दर्लन दिवकर या पथकाने ही कारवाई केली.

करासवाडा, थिवीतही कारवाई

करासवाडा व थिवीतील सहा मांसविक्री दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यातील दोन दुकाने बंद करण्याचे तसेच इतरांना आवश्यक सूचना एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिले. तसेच कळंगुट येथील दोन दुकांनामधील पदार्थांमध्ये विशेषतः चिकन लॉलीपॉप व शॉरमामध्ये जास्त प्रमाणात खाद्य रंग वापरलेले आढळले, त्यानंतर हे पदार्थ नष्ट करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेसाठी 'ढाल' बनल्यास इराण कोणालाही सोडणार नाही! मुज्तबा खामेनेईंनी सौदी अरेबिया, UAE आणि कतारला दिला सज्जड दम

US Strikes Iran: अमेरिकेकडून इराणवर हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या न्यूक्लियर डीलच्या दाव्यादरम्यान मिडल ईस्टमध्ये पुन्हा तणाव

Valpoi: वाळपईला कचऱ्याचा विळखा! उघडी गटारे, प्लास्टिक कचरा आणि सांडपाण्याची समस्या

Viral Video: 'आणखी खा चविष्ट समोसे, चिखल अन् पायाचा मळ एकत्र...', प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणारा व्हिडिओ व्हायरल; IRCTC नं घेतली दखल

Congress On Smart Meter: 'स्मार्ट मीटर'ची प्रक्रिया तात्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार: अमित पाटकरांचा इशारा

SCROLL FOR NEXT