गोवा

Durand Cup Football: एफसी गोवा बाद फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील

अगोदरचे दोन्ही सामने गमावलेल्या जमशेदपूरविरुद्ध लढत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेची (Durand Cup Football) बाद फेरी गाठण्यासाठी एफसी गोवा (Goa FC) संघ प्रयत्नशील आहे. अगोदरचे दोन्ही सामने गमावलेल्या 'जमशेदपूर एफसी'विरुद्ध (Jameshpur FC) शुक्रवारी (ता.26) पूर्ण गुण प्राप्त केल्यास गतविजेत्यांचे आव्हान कायम राहील. 'अ' गट साखळी सामना कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर (सॉल्ट लेक) खेळला जाईल.

एफसी गोवाच्या खाती सध्या दोन लढतीमधून मिळालेले तीन गुण आहेत. या गटातील अन्य दोन संघ मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब व बंगळूर एफसीने दोन्ही सामने जिंकले असून बाद फेरीसाठी ते प्रबळ दावेदार आहेत. मोहम्मेडन स्पोर्टिंगकडून हार पत्करल्यानंतर डेगी कार्दोझ यांच्या मार्गदर्शनाखालील युवा संघाने मागील लढतीत इंडियन एअर फोर्सला (Air Force) नमविले. कार्लोस सांतामरिना यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूरला मोहम्मेडन स्पोर्टिंग व बंगळूर एफसी या दोन्ही संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.

बाद फेरी पात्रतेचे लक्ष्य

एफसी गोवाचा अखेरचा साखळी सामना बंगळूर एफसीविरुद्ध होईल. त्यामुळे जमशेदपूरविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रशिक्षक डेगी कार्दोझ आशावादी आहेत. ‘‘पात्रतेसाठी काय आवश्यक आहे याची आम्हाला जाणीव आहे. त्यानुसार आम्ही तयारी केली असून उद्या चांगल्या खेळाची आशा आहे. सॉल्ट लेक स्टेडियमवर काही दिवसांपूर्वी आम्ही पहिल्या लढतीत अपेक्षित निकाल मिळवू शकलो नाही, मात्र त्याची पुनरावृत्ती होणार नाही याचा विश्वास वाटतो,’’ असे एफसी गोवाचे प्रशिक्षक म्हणाले.

स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी

एफसी गोवा

- 2 सामने, 1 विजय, 1 पराभव, 2 गोल केले, 3 गोल स्वीकारले, 3 गुण

- पराभूत वि. मोहम्मेडन स्पोर्टिंग 1-3

- वि. वि. इंडियन एअर फोर्स 1-0

जमशेदपूर एफसी

- 2 सामने, 2 पराभव, 1 गोल केला, 5 गोल स्वीकारले, 0 गुण

- पराभूत वि. बंगळूर एफसी 1-2

- पराभूत वि. मोहम्मेडन स्पोर्टिंग 0-3

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT