Street Lamps  Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत वॉकिंग ट्रॅकवरील पथदीप नादुरुस्त

अंधाराचे साम्राज्य: भटक्या कुत्र्यांचाही रहिवाशांना वाढता उपद्रव

दैनिक गोमन्तक

डिचोली: शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या वॉकिंग ट्रॅकवरील काही पथदीप गेल्या काही महिन्यांपासून पेटत नसल्याने या वॉकिंग ट्रॅकवर अंधाराचे साम्राज्य पसरते. पूल ते गावकरवाडापर्यंतच्या वॉकिंग ट्रॅकवर 31 पथदीपांची व्यवस्था करण्यात आली आहे. सद्यस्थितीत 31 पैकी किमान दहा पथदीप गेल्या 4 महिन्यांपासून नादुरुस्त आहेत. पथदीप एकतर दुरुस्त करावेत अन्यथा नवे बसवावेत, अशी रहिवाशांकडून मागणी होत आहे.

शहरातील जुना पूल ते गावकरवाड्यापर्यंत नदीकाठी बांधण्यात आलेला हा बांधवजा वॉकिंग ट्रॅक म्हणजे अनेकांचे विरंगुळ्याचे तसेच शतपावलीचे ठिकाण बनले आहे.

वॉकिंग ट्रॅक हा प्रकल्प झाल्यापासून दरदिवशी सकाळ संध्याकाळी या ट्रॅकवर लोक फेरफटका मारतात. 'कोविड'मुळे (COVID-19) काही महिने या वॉकिंग ट्रॅकवर सामसूम पसरली होती. मात्र महामारी नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा या ट्रॅकवर लोकाची वर्दळ वाढली आहे. मात्र ट्रॅकवर मधे-मधे पथदीप पेटत नसल्याने रात्रीच्यावेळी मोठी समस्या निर्माण होत असते.

वॉकिंग ट्रॅक म्हणजे शहरवासीयांना वरदान आहे. महिला (Women), वृद्ध मिळून शेकडो लोक नियमितपणे वॉकिंग ट्रॅकवर पाय मोकळे करण्यासाठी येतात. वॉकिंग ट्रॅकवर मनमोकळे फिरण्यासाठी लोकांच्या (People) सुरक्षिततेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

-प्रदीप गोवेकर, रहिवाशी

काळोखाची भीती

या ट्रॅकवर महिलांचा वावर असतो. मात्र अंधाराचा फायदा घेत एखादेवेळी अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वॉकिंग ट्रॅकवर भटक्या कुत्र्यांचाही संचार असतो. त्यातच या ट्रॅकवर यापूर्वी साप आढळून आले होते. तर गेल्या वर्षी जुलैमध्ये नदीकाठी मगर पकडण्यात आली होती. यामुळे रात्रीच्यावेळी ट्रॅकवर फेरफटका मारण्यास घाबरतात. महिलांनी तर रात्री ट्रॅककडे फिरकणे सोडून दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: ''अवघ्या एका इंचावर होता मृत्यू''! दरीत कोसळता-कोसळता वाचला पठ्ठ्या; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

Samsung Layoff 2026: टेक जगतात खळबळ! सॅमसंगने 800 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; मोबाईल अन् टीव्ही विभागातील कर्मचाऱ्यांना मोठा फटका

Lucky Zodiac Signs 2026: केतुची उलटी चाल अन् 5 राशींचा भाग्योदय! 2 ऑगस्टपासून पैशांचा पाऊस; बँक खात्यात होणार अचानक मोठी वाढ

Rohit Sharma: "मी जोपर्यंत खेळणार, तोपर्यंत हे असंच चालणार!", निवृत्तीच्या चर्चांवर रोहित शर्माने अखेर सोडले मौन; कोहलीसोबतच्या बॉण्डिंगवरही स्पष्टच बोलला

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अनेक राज्यांत महागाई भत्ता वाढवण्याची तयारी; जाणून घ्या संपूर्ण अपडेट

SCROLL FOR NEXT