सोनसोडो येथे कचरा विल्हेवाटीत दिरंगाई

खंडपीठाकडून दखल: केवळ निम्म्याहून कमी कचरा निकालात
Garbage
GarbageDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सोनसोडो येथील जुन्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात कंत्राटदाराकडून होत असलेल्या दिरंगाईची व चालढकलपणाची बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दखल घेतली. डिसेंबर 2019 मध्ये हे काम सुरू झाले, मात्र दोन वर्षे उलटली तरी कामाच्या विलंबाबाबत वारंवार सबबी दिल्या जात आहेत, त्यामुळे कामाच्या स्थितीचा अहवाल देण्याचे निर्देश देऊन खंडपीठाने पुढील सुनावणी 4 एप्रिलला ठेवली आहे. आतापर्यंत अर्ध्याहून कमी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

Garbage
गोव्यात भाजप सत्तास्थापनेची कुठलीही संधी सोडणार नाही: तानावडे

जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी ॲड. नॉर्मा आल्वारिस यांनी या कामाला विलंब होत असल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. खंडपीठाने 20 जानेवारी रोजी सोनसोडोवरील जुन्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार गोवा (Goa) कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अहवाल सादर केला आहे. त्याची प्रत याचिकादाराच्या वकिलांना देण्यात आली. या अहवालानुसार अजूनही अर्ध्याहून अधिक कचरा विल्हेवाटीचे काम बाकी आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास हे काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यताही कमी आहे, अशी बाजू याचिकादाराच्या वकिलांनी मांडली.

सोनसोडो येथील कचऱ्याची विल्हेवाट लावून तेथून उचलण्याचे काम डिसेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र, मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन (Lockdown) लागू झाल्याने काम बंद राहिले. पुन्हा ते 2020 मध्ये सुरू झाले. मात्र, जून 2020 मध्ये पावसामुळे ते बंद ठेवण्यात आले. डिसेंबर 2020 पासून सुरू होऊन मे 2021 पर्यंत काम सुरू होते. त्यानंतर पावसाळ्यामुळे आरडीएफ व उर्वरित कचरा त्यावर आवरण घालून झाकण्यात आले होते. डिसेंबर २०२१ मध्ये काम सुरू झाले तेव्हाच पुन्हा कोरोना महामारीचे प्रमाण वाढले तसेच पाऊसही पडला होता, अशा सबबी देत आता हे काम येत्या 10 मार्चपासून सुरू करण्यात येणार असून तेथे यंत्रसामुग्री ठेवण्यात आली आहे, असे व्यवस्थापकीय संचालकांनी अहवालात म्हटले आहे.

Garbage
Goa Election: गोव्यात मतमोजणीची तयारी सुरू

16 हजार घनमीटर आरडीएफ सिमेंट फॅक्टरीला

सोनसोडो येथे सुमारे 2,31,279.76 घनमीटर कचरा (Garbage) होता, त्यापैकी सुमारे 1,01,208 घनमीटर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. या कचऱ्यापासून आरडीएफ बनविण्याचे काम नोव्हेंबर 2021 पासून सुरू करण्यात आले. आतापर्यंत कंत्राटदाराने 16 हजार घनमीटर आरडीएफ सिमेंट फॅक्टरीला पाठवले आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये 5030 घनमीटर आरडीएफ पाठवले आहे. त्यामुळे एकूण 21,030 घटमीटर आरडीएफ आतापर्यंत निकालात काढण्यात आले आहे. या कचऱ्यातील सुमारे 45 हजार घनमीटर कंपोस्ट व इतर साहित्य निकालात काढण्यात आले आहे, अशी माहिती अहवालात दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com