पणजी: राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार पूर्ण बहुमतांसह सत्तेत येईल असा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला. सत्तास्थापनेसाठीचे आवश्यक ते सर्व प्रयत्न भाजप करेल. यासाठी समविचारी पक्ष आणि अपक्ष उमेदवारांशी विविध पातळ्यांवर चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
मतमोजणीला अजून आठवडा शिल्लक असताना सत्तास्थापनेसाठीच्या राज्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या हालचाली यापुढे अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तानावडे बोलत होते. सत्तास्थापनेसाठी काही जागा कमी पडल्या तर त्या कशा मिळवाव्यात यासाठी भाजपने मंथन सुरू केलेले आहे. प्रभारी आणि केंद्रीय नेतृत्वही यासाठी विशेष प्रयत्न करेल असे संकेत तानावडे यांनी दिले.
मतदानानंतर आता सर्वांना मतमोजणीचे वेध लागले आहेत. विविध सर्व्हेक्षणांच्या आधारे राज्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे भाजप व काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच भाग म्हणून गेल्या रविवारी भाजपचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोव्याला भेट देत मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांची भेट घेतली होती. निवडणुकीपूर्वी भाजपला विरोध करणाऱ्या मगोने तृणमूल काँग्रेसशी युती करत 13 जागा लढवल्या आहेत. मगो (MGP) हा राज्यातील जुना पक्ष असून या निवडणुकीतही त्यास निर्णायक जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि ढवळीकर यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
अपेक्षा बहुमताची; 21 जागा मिळण्याची आशा
यंदा प्रथमच भाजपने (BJP) राज्यातील सर्व 40ही मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. त्यातून सत्तेसाठी आवश्यक असलेले 21 उमेदवार निवडून येतील अशी भाजपला अपेक्षा आहे. मात्र काही जागा कमी पडल्यास अपक्ष उमेदवार आणि छोट्या पक्षांची मदत घेण्याची तयारीही भाजपने सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षानेही हालचाली वाढविल्या आहेत. कारण गतनिवडणुकीचा कटू अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.