Fatty Liver Disease Dainik Gomantak
गोवा

Fatty Liver Disease : धक्कादायक ! गोव्यात फॅटी लिव्हर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : बदलती जीवनशैली आणि सकस आहाराचा अभाव यामुळे गोव्यात फॅटी लिव्हर रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याकरिता शारीरिक बदलाची शंका असल्यास वेळीच तपासणी करून घ्यावे, असे आवाहन बंगळूरच्या एस्टर सीएमआय रुग्णालयाचे डॉ. सोनल अस्थाना यांनी केले आहे.

यकृत आरोग्याचे महत्त्व, जनजागृती आणि यकृत आजारांचा लवकर शोध याकरिता एस्टर सीएमआय हॉस्पिटल, बंगळुरू च्या वतीने पणजीत आज (शुक्रवार) मेटाबॉलिक लिव्हर स्क्रीनिंग शिबिराचे आयोजन केले होते. डॉ. सोनल अस्थाना म्हणाले, भारतात यकृत रोगाची महामारी आहे, जी आहार आणि जीवनशैलीतील बदलांशी संबंधित आहे. देशात ३ पैकी १ भारतीयांना फॅटी यकृताशी संबंधित आजार होतो.

विशेषत: गोव्यातील प्रत्यारोपणासाठी प्रगत यकृत रोग किंवा यकृताचा कर्करोग असलेले रुग्ण आम्ही मोठ्या संख्येने पाहत आहोत. दुर्दैवाने, यापैकी बऱ्याच साधन सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध नाहीत. गोव्यात जन्मजात अनेक मुलांना यकृताच्या विकारांमुळे यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता भासत आहे. एस्टर इंटिग्रेटेड लिव्हर केअर बेंगलोरु मध्ये यकृत प्रत्यारोपण मोठा कार्यक्रम राबविला जात आहे. येथे स्वतंत्र बालरोग यकृत प्रत्यारोपण विभाग कार्यरत आहे. जो सेवाभावी संस्थांच्या मदतीने चालतो.

एस्टर सीएमआय हॉस्पिटलने अलीकडेच केएलई हॉस्पिटल, बेळगावशी थेट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी करार केला आहे. ज्यामुळे गोव्यातील रूग्णांना प्रत्यारोपण सुविधा आणि प्रगत यकृत काळजी घेणे सोपे झाले आहे. ही सुविधा गोव्यात उपलब्ध झाल्यास त्याचा स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होईल.आम्ही यकृताचे आरोग्य चांगले राखण्यासाठी निरोगी जीवनशैलीच्या पद्धतींबद्दल समुपदेशन देखील करतो, असेही डॉ. अस्थाना म्हणाले.

निरोगी जीवन जगणाऱ्याचा सत्कार

निरोगी जीवन जगणाऱ्या गोव्यातील प्रत्यारोपण रुग्णांचा सत्कार केला. यकृत प्रत्यारोपण केलेल्या आणि आता निरोगी जीवन जगत असलेल्या या रुग्णांच्या धैर्याची आणि इतरांना वेळेत उपचारासाठी प्रोत्साहित करणे हा या सत्कार कार्यक्रमाचा उद्देश होता. यावेळी प्रत्यारोपणाचे प्राप्तकर्ते उमेश ढवळीकर, डॉ. यशवंत धुमे, सुजाता चौघुले, स्टीफन फर्नांडिस यांनी आपले विचार व्यक्त केले.

काय काळजी घ्यावी

  • नैसर्गिक आहाराला प्राधान्य जंग फूड टाळा, साखर कार्बो पदार्थ कमी करणे

  • दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम

  • वजनावर नियंत्रण

  • सुरक्षित सेक्स, चांगल्या ठिकाणी उपचार

  • कविळीबाबत काळजी घेणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT