Goa-Raipur Flight: गोवा-रायपूर फ्लाईटला तब्बल चार तास उशीर; प्रवाशांचा गोंधळ

एअरलाईनच्या कर्मचाऱ्यांशी प्रवाशांचा वाद
Goa-Raipur Flight
Goa-Raipur FlightDainik Gomantak
Published on
Updated on

Goa-Raipur Flight: इंडिगो एअर लाइन्सची उड्डाणे गेल्या काही काळापासून उशीरा आणि रद्द होत आहेत. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. शुक्रवारी इंडिगोच्या गोवा-रायपूर विमानाच्या उड्डाणाला नियोजित वेळेपेक्षा तब्बल चार तास उशीर झाला. त्याचा फटका प्रवाशांना बसला.

Goa-Raipur Flight
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरात वाढ; दक्षिण गोव्यात किंमती स्थिर

विमानतळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून इंडिगो एअरलाइन्सची फ्लाइट (6E-712) इंदूरला 4.25 वाजता पोहोचते आणि 5 वाजता रायपूरला पोहोचते. मात्र ही फ्लाईट नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिरा इंदूरला पोहचली. ती फ्लाईट 8.30 वाजता पोहोचली, तर रात्री 9 वाजता रायपूरकडे प्रयाण केले.

विमान कंपनीने विमानतळ व्यवस्थापनाला ऑपरेशनल कारणांमुळे उड्डाणाला उशीर झाल्याचे सांगितले आहे. तर सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, शुक्रवारी गोव्यात विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उड्डाणाला उशीर झाल्याचे समजते.

विमानाला उशीर झाल्यामुळे इंदूरहून रायपूरला जाणाऱ्या प्रवाशांना विमानतळावरच थांबून राहावे लागले.

Goa-Raipur Flight
Buldhana Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! खासगी बसला लागलेल्या आगीत होरपळले 25 प्रवासी

त्यामुळे त्यांना नाहक मनस्ताप झाला. प्रवाशांच्या नियोजित कामावर त्याचा परिणाम झाला. काही प्रवाशांनी एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांना यावरून जाब विचारला. यावेळी जोरदार वादावादी देखील झाली. काही काळ प्रवाशांचा हा गोंधळ सुरू होता.

एअरलाइन्सचे अधिकारी आणि विमानतळ व्यवस्थापनाने प्रवाशांना कसेबसे शांत केले. त्याचप्रमाणे इंडिगोचे अहमदाबादहून इंदूरला दुपारी 12.40 वाजता जाणारे आणि दुपारी 1 वाजता अहमदाबादला परतणारे विमानही काल अडीच तास उशिराने धावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com