Goa Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Fatorda: फातोर्ड्यात ट्रॅफिक पोलीस Action Mode वर! 173 जणांवर कारवाई; विनाहेल्मेट 99 जणांना दंड

Fatorda Traffic Police Goa: फातोर्डा वाहतूक पोलिसांनी वाहन नियमाचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करताना आत्तापर्यंत १७३ जणांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे.

Sameer Panditrao

मडगाव: फातोर्डा वाहतूक पोलिसांनी वाहन नियमाचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करताना आत्तापर्यंत १७३ जणांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. मागच्या महिन्यात नव्यानेच हे पोलिस ठाणे सुरू करण्यात आले आहे.

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर येथील पोलिसांनी नजर ठेवली आहे.  विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या ९९ जणांना पोलिसांनी पकडले आहे. त्या पाटोपाठ नो एन्ट्रीतून वाहने चालविणाऱ्यांचा  क्रमांक लागत आहे. अशा प्रकरणात  एकूण तेहतीस  जणांवर कारवाई करून पोलिसांनी संबधितांकडून दंड वसूल केला.

वाहने  चालविताना मोबाईल वापरणे ५, क्षमतेपेक्षा जास्त लोकांना वाहनावर बसविणे २, विना सीट बेल्ट कार चालविणे ५, कुठेही वाहने पार्क करणे ७, विना वाहन क्रमांक ४ जणांवरही  पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहन नियम उल्लंघनाची अन्य प्रकरणेही पोलिसांनी नोंदवून संबधितांना  दंड ठोठावला आहे. 

वाहने  चालविताना वाहन नियमांचे पालन करावे, कायदा कुणीही हाती घेऊ नये व कायद्याचा भंगही करू नये, असे आवाहन फातोर्डा वाहतूक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांनी केले असून जो कायदा मोडेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.  

या पोलिस ठाण्यात  १ पोलिस निरीक्षक , २ उपनिरीक्षक, ४ साहाय्यक वाहतूक पोलिस उपनिरीक्षक,  १३ हवालदार, १४ पोलिस शिपाई, एक महिला साहायक पोलिस उपनिरीक्षक असा कर्मचारी वर्ग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT