Modi Traffic Challan: ‘मोदीजी वाहन दंड भरा...’, सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट चर्चेत

सोशल मीडियावर दररोज व्हिडिओ, रिल्स आणि पोस्ट व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
Modi Traffic Challan: ‘मोदीजी वाहन दंड भरा...’, सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट चर्चेत
Published on
Updated on

सोशल मीडियावर दररोज व्हिडिओ, रिल्स आणि पोस्ट व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये खुद्द प्रतंप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करण्यात आले आहे. पोस्टमध्ये लिहिले की, "प्रिय @narendramodi जी, तुमच्या वाहन क्रमांक DL2CAX2964 चे 3 वाहन दंड भरले नाहीत, कृपया वेळेवर दंड भरा आणि पुढच्या वेळी असे होणार नाही याची काळजी घ्या... Cc: @PMOIndia @HMOIndia''

आधी ही पोस्ट पाहा!

दरम्यान, या ट्विटमध्ये ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मवरुन घेतलेला एक स्क्रीनशॉट आहे, जो वर उल्लेख केलेल्या क्रमांकाविरुद्ध प्रलंबित वाहन दंड असल्याचे दर्शवतो. हे वाहन थेट पंतप्रधानांच्या नावाने किंवा ताफ्यातील नोंदणीकृत असल्याचे स्पष्ट नाही. मात्र सध्या या पोस्टने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. अनेकांनी सामान्य नागरिकांप्रमाणेच नियमांनुसार मोठ्या आणि व्हीआयपी व्यक्तीला पकडल्याबद्दल पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले.

दुसरीकडे, दिल्ली वाहतूक पोलिसांनी अद्याप अधिकृतरित्या दंडाच्या स्थितीची पुष्टी केलेली नाही. या घटनेमुळे वाहतूक कायद्यांच्या समान वापराबद्दल विशेषतः सरकारी अधिकारी आणि व्हीआयपींसाठी पुन्हा एकदा व्यापक वादविवाद सुरु केला आहे. तसेच, या पोस्टवर आतापर्यंत पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) किंवा गृह मंत्रालय (एमएचए) कडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याशिवाय, दिल्ली वाहतूक पोलिसांनीही या दाव्याच्या वैधतेवर भाष्य केलेले नाही.

Modi Traffic Challan: ‘मोदीजी वाहन दंड भरा...’, सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट चर्चेत
Viral Video: 'प्रमोद सावंत राजीनामा द्या'; कपडे काढून मुरगावात एकजण पावसाच्या पाण्यात लोळला; व्हिडिओ व्हायरल

मात्र, या पोस्टला लक्षणीय लोकप्रियता मिळत आहे, हजारो शेअर्स आणि लाईक्स मिळत आहेत. तसेच, नेटीझन्सनी मूलभूत रस्ते सुरक्षा नियमांपासून ते जबाबदारीच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरु केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com