Fatorda Stadium Roof Repairing Dainik Gomantak
गोवा

फातोर्डा स्टेडियमवरील पत्रे पुन्हा उडाल्याची अफवाच

परिसरातील नागरिकांकडून छपराबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव : फातोर्डा स्टेडियमवरील छपराचे पत्रे पुन्हा एकदा उडाल्याची चर्चा शुक्रवार सकाळपासून मडगावात पाहायला मिळाली. गुरुवारी रात्री वार्‍यामुळे पुन्हा एकदा हे पत्रे उडाल्याचं बोललं जात होतं. मात्र ही अफवाच असल्याचं आता समोर आलं आहे. छपराचे पत्रे उडाले नसल्याचं स्पष्टीकरण स्टेडियमचे व्यवस्थापक राजेश नाईक यांनी दिलं आहे.

आठवड्याभरापूर्वीच 10 मार्च रोजी रविवारी रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमच्या वेस्ट स्टॅण्ड वरील छप्पर उडून गेले होते. यामुळे सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या छप्पराच्या तातडीच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली होती. मात्र दुरुस्ती होते न होते तोच पुन्हा हे पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे स्टेडियमवरील कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

फातोर्डा स्टेडियमचं हे छप्पर सुमारे 30 वर्षे जुनं असून यापूर्वीच ते बदलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे हे काम सुरु होऊ शकले नव्हते. या घटनेची क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी त्वरित दखल घेताना संबंधित अभियंत्यांना तातडीने दुरुस्ती हातात घेण्याची सूचना केली होत्या.

गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी आज मंगळवारी सकाळी 6 वाजता फातोर्डा स्टेडियमची पाहणी केली आणि तेथील अधिकाऱ्यांना कडक शब्दांमध्ये खडे बोल सुनावले.आज त्यांनी इनडोअर स्टेडियम, जिम, जलतरण तलावासह परिसराची पाहणी केली. हल्लीच वादळी वाऱ्यामुळे स्टेडियमवरील पत्रे खाली पडले होते. त्याची पण पाहणी केली आणि दुरुस्तीचे आदेश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT